सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई रहिवासी इमारतीच्या 10व्या मजल्यावर भीषण आग

मुंबईत पुन्हा एकदा इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरळीमध्ये पूनम चेंबरजवळ स्टर्लिंग सीफॅस इमारतीला ही आग लागली असल्याची माहिती देण्यात आली आहे

Aishwarya Dubey
  • Aug 26 2020 9:19AM

मुंबईत पुन्हा एकदा इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरळीमध्ये पूनम चेंबरजवळ स्टर्लिंग सीफॅस इमारतीला ही आग लागली असल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास इमारतीच्या 10व्या मजल्यावर ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी तातडीने 11 व्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. या अपघातात कोणीही जखमी झालं नसून अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली गेली आहे.

सध्या कूलिंग करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तर भीती शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं प्राथमिक कारण समोर आलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबईत इमारतींना आग लागण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार