सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एका कोरोना योद्ध्याच्या कुटुंबाची लढाई, घरातील कर्ता गमावला आता पत्नी व मुलाचाही व्हायरसशी लढा

आतापर्यंत अनेक कोरोना योद्धांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी देशसेवेसाठी केलेले काम भारतीय कधीही विसरणार नाही

Sudarshan MH
  • May 9 2020 1:03PM

सोनीपत, 09 मे : कोरोनाच्या (Coronavirus) संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दिल्लीतील पोलीस कॉन्स्टेबल अमित राणा यांची पत्नी आणि 3 वर्षांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. सोनीपत स्वास्थ विभागाने दोघांनाही आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. अमित राणा हे सोनीपत गावात हुलहेडीत राहत होते. ते दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल पदावर होते.

दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमित राणा यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली होती. त्यांनी जवानाच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केलं. याबाबत अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, अमित यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना व्हायरसच्या या संकटात दिल्लीकरांची सेवा करीत राहिले. ते जनतेला वाचविण्यासाठी स्वत: संक्रमित झाले आणि आम्हाला सोडून गेले. मी त्यांच्या कर्तृत्वाला नमन करतो. त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची सन्मान निधी दिला जाईल.

अमित कुमार यांचा योग्यवेळी उपचार होऊ शकला नाही, असा आरोप त्यांच्या सहकार्यांकडून केला जात आहे. ते अधिकारी असते तर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते असेही यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार