सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एकनाथ खडसे आज संध्याकाळी करणार मोठा धमाका

बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधीत काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Sudarshan MH
  • Nov 30 2020 12:37PM

 भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज मोठा खुलासा करण्याच्या तयारीत आहे.  त्यामुळे खडसे कुणाची नावं जाहीर करता हे पाहण्याचे ठरणार आहे.

बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधीत काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळेच  एकनाथ खडसे हे आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

'या प्रकरणामध्ये बँकेची मालमत्ता ही कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आली आहे, यामध्ये जिल्ह्यातील दिग्गज नेते, आमदार, खासदार आणि माजी मंत्र्याचा सुद्धा समावेश आहे', असा दावा खडसे यांनी रविवारी केला होता.

तसंच, 'बीएआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी 2018 पासून अनेक वेळा तक्रारी केल्या आहे. या सोबतच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवर देखील दिल्ली इथं अॅड. कीर्ती पाटील यांनी देखील तक्रार केली आहे, असंही खडसे यांनी सांगितले.

राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा सरकारने या प्रकरणाची कारवाईही थांबवली होती, असं सांगत खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले आहे. पण, बीएआर संस्था ही मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा 2002 प्रमाणे संस्थेवर कारवाई करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे, त्यामुळे राज्याचे सहकार आयुक्त कारवाई करू शकत नव्हते, त्यामुळे राज्याने आपला अहवाल पाठवून कारवाई थांबवली होती, असंही खडसे यांचं म्हणणे आहे.

'या प्रकरणामध्ये जळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी मंत्र्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. अशात जर काही माहिती दिली तर चौकशीमध्ये हस्तक्षेप केल्यासारखे होईल. त्यामुळे आताच नावे जाहीर करणे हे योग्य ठरणार नाही म्हणून एकदा का चौकशी पूर्ण झाली की दोन दिवसांत संपूर्ण माहितीसह पत्रकार परिषद घेणार आहे', असंही खडसे यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार