सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

UP: दारु माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना

दारु माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Sudarshan MH
  • Feb 10 2021 10:16AM

दारु माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये घडली आहे. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी मोतीचा भाऊ एलकार सिंहला ठार मारलं आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी एलकार सिंहवर अनेक गुन्ह्यांचा आरोप असून तो यापूर्वी अनेकदा जेलमध्ये गेला होता.

काय आहे प्रकरण?

सिढपुरा पोलीस स्टेशन परिसरातील नगला धीमर गावातील ही घटना आहे. या ठिकाणी पोलीस अधिकारी अशोक पाल आणि त्यांची टीम गावातील दारु माफियांवर कारवाई करण्यासाठी गेली होती. त्यावेळी दारु माफियांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना बंदी बनवले. यावेळी झालेल्या मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हे प्रकरण हातळण्यातील पोलिसांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वी बिकरुमध्ये झालेल्या घटनेपासून कोणताही बोध न घेता मर्यादीत स्वरुपातील पोलिसांची टीम कारवाई करण्यासाठी घटनास्थळी गेल्यानं हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

या प्रकरणाची माहिती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना पोलीस अधिकारी अशोक पाल हे गावापासून दूर एका शेतामध्ये निर्वस्त्र अवस्थेत आढळले. तर, पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह घटनास्थळी सापडला.

मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा

या प्रकरणात गंभीर जखमी झालेले पोलीस अधिकारी अशोक पाल यांना अलीगढ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर हुतात्मा पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणातील आरोपींना राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आदेश दिले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार