सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या (केशरी) शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदुळ

शिधापत्रिका उपलब्ध नाही अशा रहिवाश्यांना ५ किलो तांदूळ व १ किलो अख्या चणा देण्याचे संबंधित

मनीष गुप्ता
  • Jun 13 2020 12:59PM
पालघर  : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून, २०२० या दोन महीन्याच्या कालावधीकरीता प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदुळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत विक्री करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 
       केंद्र शासनाने ज्या रहिवाश्यांकडे शिधापत्रिका उपलब्ध नाही अशा रहिवाश्यांना ५ किलो तांदूळ व १ किलो अख्या चणा देण्याचे संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडूनवाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे.

कोरोना विषाणूचा (कोव्हिड-१९) संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून लाकडाऊन घोषित करण्यात आले होते, लॉकडाऊन कालावधीमध्ये अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियिम, २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह २५ किलो तांदुळ व १० किलो गहू वितरीत केला जातो. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य प्रतिमाह ३ किलो तांदुळ व २ किलो गहू या अन्न धान्याचे नियमित वाटप करण्यात येत आहे. या योजनेखाली लाभ घेणान्या शिधापत्रिकाधारकांना प्रति सदस्य प्रति माह ५ किलो तांदुळ व १ किलो डाळ (तूरडाळ व चणाडाळ दोन्हीपैकी एक डाळ १ किलो मर्यादेत) डाळीचे मोफत वितरण करण्यात येत आहे.असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 
       राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून, २०२० या दोन महीन्याच्या कालावधीकरीता प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदुळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत विक्री करण्यात येत आहे.
     केंद्र शासनाने ज्या रहिवाश्यांकडे शिधापत्रिका उपलब्ध नाही अशा रहिवाश्यांना ५ किलो तांदूळ व १ किलो अख्या चणा देण्याचे संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडूनवाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे.पालघर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्याकडून नविन व विभक्त शिधापत्रिकांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.असेही जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले. 
      त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यांकडे प्रवर्गनिहाय अर्ज प्राप्त झाले आहेत. नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी ४६३० अर्ज तर विभक्त शिधापत्रिका मिळण्यासाठी ४०६१ अर्ज असे एकूण ८६९१ अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी अपूर्ण कागदपत्रां अभावी नविन शिधापत्रिकेसाठी आलेल्या अर्जापैकी १०३६ व विभक्त शिधापत्रिकांसाठी २३९२ अशा एकूण ३४२८ अर्जाची कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत संबंधित अर्जदारांना कळविण्यात आलेले आहे. विभक्त व नविन अर्जाची ज्यांची कागदपत्रे पूर्ण होती अशा ५२०६ शिधापत्रिका तयार केलेल्या असून वाटपा संबंधि संबंधित तहसील कार्यालयाला सूचना देण्यात आल्या आहे 
एकही नागरीक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन काळजी घेत आहे.असेहि जिल्हाधिकारी डॉ शिंदे यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार