सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अनलॉक-3 ची प्रक्रिया सुरू करण्यात आली

अनलॉक-3 ची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही खालील गोष्टी करू शकणार नाही आहात.

Aishwarya Dubey
  • Jul 30 2020 11:43AM

Coronavirus चा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसला, तरी देशभरातल्या लॉकडाऊनचे नियम आणखी थोडे शिथिल होणार आहेत.मात्र असे असले तरी, अद्यापही काही गोष्टींना परवानगी देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही खालील गोष्टी करू शकणार नाही आहात.

केंद्रीय गृह मंत्रालयनं दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टपर्यंत सर्व राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्था बंदच राहणार आहेत.देशातील मेट्रो सेवा बंदच राहणार आहेत. मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात आली असली तरी, सामन्यांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही आहे.

सिनेमा हॉलही बंद ठेवण्यात येणार आहे. याआधी सरकार काही प्रमाणात सिनेमा हॉल खुले करण्याच्या विचारत होती, मात्र अद्याप सिनेमागृहांना परवानगी देण्यात आलेली नाही आहे.त्याचबरोबर स्विमिंग पूलही बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे जिमला परवानगी देण्यात आली असली करी, स्विमिंग पूल मात्र बंदच राहणार आहे.

त्याचबरोबर मनोरंजन पार्कही 31 ऑगस्टपर्यंत बंद असणार आहेत. तर, सामाजिक, राजकिय, खेळ, मनोरंजक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही आहे.सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा आणि तंबाखू खाण्यावर बंदी कायम आहे.लग्न समारंभात अजूनही 50 हून अधिक लोकांच्या समावेशावर बंदी आहे.

 अंत्यसंस्कारातही 20हून अधिक लोक भाग घेऊ शकत नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने हे नियम कडक केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार