सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी ! जाणून घ्या इथे

कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर केंद्र सरकारने यात काहीशी शिथिलता दिली आहे

Aishwarya Dubey
  • Oct 9 2020 7:36PM

कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर केंद्र सरकारने यात काहीशी शिथिलता दिली आहे. वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, कांद्याची निर्यात काहीशी शिथिल केली जात आहे, जेणेकरुन बेंगळुरु आणि कृष्णपूरममध्ये उत्पादन होणाऱ्या कांदा 10 हजार मॅट्रिक टनपर्यंत निर्यात केला जाऊ शकेल. याची त्वरित अंमलबजावणीही करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारने, नाशिकमधून कांद्याच्या निर्यातीस मंजुरी दिलेली नाही.

चेन्नई बंदरातून होणार निर्यात

मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 पर्यंत कांद्याची निर्यात केवळ चेन्नई पोर्टहूनच केली जाणार आहे. त्यासाठी निर्यातदारांना कांदा निर्यात करण्यासाठी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या हॉर्टिकल्चर विभागातून प्रमाणपत्र घ्यावं लागेल. तसंच निर्यातदारांना लोकल DGFT कार्यालयातही रजिस्ट्रेशन करावं लागेल, जेथून निर्यातीवर लक्ष ठेवलं जाईल.

 

हे वाचा - सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; आता येतंय Green Ration Card, जाणून घ्या याबाबत

 

आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारताने 32.8 कोटी डॉलर किंमतीच्या कांद्याची निर्यात केली होती. एप्रिल-जुलैदरम्यान बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात 158 टक्के वाढली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह बांगलादेश आणि नेपाळनेही सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला होता. कांद्यासाठी हे दोन्ही देश भारतावर अवलंबून आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार