सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी संध्याकाळी 4 वाजता जनतेसोबत ऑनलाईन संवाद साधणार

भाजपनं पुन्हा एकदा कमळ फुलवण्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह रविवारी बिहारमध्ये जनतेसोबत संवाद साधणार आहेत

Aishwarya Dubey
  • Jun 7 2020 10:54AM

भाजपनं पुन्हा एकदा कमळ फुलवण्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह रविवारी बिहारमध्ये जनतेसोबत संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ऑनलाईन रॅली करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत भाजप कार्यकर्तेही यामध्ये सामिल होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी संध्याकाळी 4 वाजता जनतेसोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यासाठी बिहारमध्ये 72 हजार LED स्क्रीन लावण्यात आले आहेत. या रॅलीत सुरुवातील केवळ 22 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता मात्र आता संपूर्ण बिहारमध्ये 72 क्रीन बसवल्याची माहिती मिळत आहे. ऑनलाईन रॅलीद्वारे अमित शाह यांचं भाषण 2 लाख लोक ऐकणार आहेत.

 

आतापर्यंत पहिल्यांदाच अशाप्रकारची ऑनलाइन रॅली काढण्यात येत असल्यानं बिहारमधील जनताही चांगला प्रतिसाद देईल. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही रॅली ऐतिहासिक असेल आणि यशस्वी होईल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जैस्वाल यांनी व्यक्त केला आहे.

अमित शहा यांचे भाषण 72 हजार बूथवर ऐकण्याची तयारी भाजप नेत्यांनी केली आहे. या विधानसभा मतदारसंघात 4-5 हजार लोकांना जोडण्याचे लक्ष्य आहे. यासोबतच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी एका ठिकाणी 50 पेक्षा जास्त लोक जमणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आली आहे. अमित शाहांचं भाषण ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार