सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मी आजारी या केवळ अफवा, मी ठणठणीत बरा : अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ट्विट करत आपली प्रकृती ठणठणीत आहे. मी आजारी आहे या फक्त आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर एक निवेदन सादर केले आहे.

Aishwarya Dubey
  • May 10 2020 10:37AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ट्विट करत आपली प्रकृती ठणठणीत आहे. मी आजारी आहे या फक्त आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर एक निवेदन सादर केले आहे. 

ते या निवेदनात म्हणतात की, माझ्या प्रकृती अस्वस्थ असल्याच्या केवळ अफवा आहेत. काहीजणांनी सोशल मीडियावर माझ्या प्रकृतीविषयी अनेक अफवा पसरवल्या आहेत. एवढेच नाही तर काही नाही माझ्या मृत्यूसाठी ही प्रार्थना केली आहे. सध्या आपला देश कोरोनासारख्या जागतिक महामारी विरोधात लढत आहे. आणि मी गृहमंत्री म्हणून दिवस-रात्र कामात व्यस्त आहे. त्यामुळे मी याकडे लक्ष दिले नव्हते.

मात्र जेव्हा माझ्या लक्षात आले की, माझी तब्येत खराब असल्यासचा काल्पनिक आनंद ह्या अफवा पसरविणाऱ्यांना होत आहे त्यामुळे मी आज हा खुलासा करत आहे. 


तसेच पक्ष कार्यकर्ते आणि शुभचिंतकांच्या काळजीपोटी आज मला मी ठणठणीत असल्याचे मला सांगावं लागत आहे, असं ते यावेळी म्हणाले. 


पुढे ते म्हणाले, माझ्या तब्येतीबद्दल चिंता करणाऱ्या आणि विचारपूस करणाऱ्या माझ्या सर्व शुभचिंतकांचे आणि  कार्यकर्त्यांचे आभार मानतो. ज्या लोकांनी ही अफवा पसरवली आहे त्या लोकांविरोधात माझ्या मनात कोणताही राग नाही. 


दरम्यान, अमित शहा यांची प्रकृती खालावल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी गुजरात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार