सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

कोरोना विरोधातील देशाचा ‘नायक’

भारतातील हजारो डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाबाधितांना लवकर बरे वाटावे म्हणून दिवसरात्र झटत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चाचणी, आयसोलेशन, क्वारेंटाईनपासून विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे.

Sudarshan MH
  • Apr 16 2020 4:08PM

भारतातील हजारो डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाबाधितांना लवकर बरे वाटावे म्हणून दिवसरात्र झटत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चाचणी, आयसोलेशन, क्वारेंटाईनपासून विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे. सद्यकाळात सर्वांच्याच कानावर आयसीएमआर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे नाव वारंवार पडतेय. सरकारच्या पत्रकार परिषदेत आयसीएमआरचा प्रतिनिधी असतो. सर्वप्रकारची आकडेवारी, माहिती आयसीएमआरकडूनच उपलब्ध केली जाते.

मोठी संशोधन संस्था

आयसीएमआर जगातील सर्वात जुन्या आणि मोठय़ा वैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक आहे. भारतात बायोमेडिकल रिसर्चचे फॉर्म्यूलेशन, समन्वय आणि प्रसारासाठी ही सर्वोच्च संस्था आहे. 1911 मध्ये इंडियन रिसर्च फंड असोसिशएनच्या रुपात या संस्थेचा पाया रचला गेला होता. आयसीएमआरला केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून निधी पुरविला जातो.

आयसीएमआरचे कार्य

संशोधनाद्वारे देशाच्या नागरिकांचे आरोग्य सुधारावे यासाठी आयसीएमआर प्रयत्नशील आहे. आयसीएमआरने 5 लक्ष्य निर्धारित केली आहेत. नवी माहिती प्राप्त करत त्यावर संशोधन करणे, समाजाच्या वंचित वर्गातील आरोग्य समस्यांवरील संशोधन वाढविणे, आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी आधुनिक जीवशास्त्राrय साधनांचा वापर वाढविणे, आजारांपासून बचावासाठी डायग्नोस्टिक्स, उपचार, लसीकरणाला चालना देणे, आरोग्य सुविधा बळकट करून देशातील वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संशोधन संस्थांमध्ये संशोधन संस्कृती विकसित करण्याचे लक्ष्य संस्थेने बाळगले आहे.

कोविड विरोधात लढा

देशात चाचणीसाठी प्रयोगशाळांना परवानगी आयसीएमआरकडूनच दिली जाते. चाचणी, आयसोलेशन/क्वारेंटाईन आणि रुग्णावर देखरेखीशी संबंधित सर्व दिशानिर्देश याच संस्थेकडून दिले जातात. रुग्णांच्या विदाच्या आधारावर आयसीएमआर विविध अहवाल तयार करत रणनीति आखते. कोविड-19 शी संबंधित मार्गदर्शक सूचना तयार करण्यातही आयसीएमआर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आयसीएमआरचे संशोधक कोविड-19 वर संशोधन करून अँटीडोट तसेच लस तयार करू पाहत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार