सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमृता फडणवीस भाऊबीजेच्या दिवशी एक गाणं पोस्ट करुन सगळ्या भाऊरायांना एक मागणं केलं

जाणून घ्या अमृता फडणवीस नेमकं काय म्हणत आहेत

Aishwarya Dubey
  • Nov 17 2020 8:43AM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस भाऊबीजेच्या दिवशी एक गाणं पोस्ट करुन सगळ्या भाऊरायांना एक मागणं केलं आहे. त्यांनी हे गाणं प्रत्येक भाऊरायाला समर्पित केलं आहे. “आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे.. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या” असं म्हणत त्यांनी त्यांचं नवं गाणं ट्विट केलं आहे. फेसबुकवरही त्यांनी हे गाणं पोस्ट केलं आहे.

 

अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं स्त्रियांना समर्पित केलं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओत अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरला आहे. तसंच स्त्रिया या कशाप्रकारे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आहेत ते दाखवून दिलं आहे. स्त्री भ्रूण हत्या होतात, स्त्रियांना नाकारलं जातं, त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जातं, त्यांच्यावर अत्याचार होतात हे सगळं टाळण्याचं आवाहन अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्यातून केलं आहे. समाज जागृतीच्या दृष्टीने त्यांनी त्यांचं नवं गाणं समोर आणलं आहे.

अमृता फडणवीस यांनी हे गाणं ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करताच त्यांच्या या गाण्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. काही नेटकऱ्यांनी हे गाणं आवडल्याचं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. मात्र अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या भाऊरायांना दिवाळीच्या निमित्ताने स्त्री ला जगू द्या, समाज भक्कम करायचा असेल तर तिला शिकू द्या असं म्हटलं आहे. तसंच सगळ्या स्त्रियांना हे गाणं समर्पित केलं आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार