सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

करोना व्हायरसच्या या संकटकाळात डॉक्टर अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत

Aishwarya Dubey
  • May 20 2020 10:52AM

करोना व्हायरसच्या या संकटकाळात डॉक्टर अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनात कुठलीही कपात करु नये, अशी मागणी महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

“करोनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्याकाळात ‘डॉक्टर हेच देव’ असल्याचा आपल्याला अनुभव येत आहे. विशेषत: राज्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे कितीही आभार मानले तरी ते अपुरेच ठरतील. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानधनात कपात करणे कुठल्याही दृष्टीने पटणारे नाही” असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच आरोग्य सेवा आयुक्तालय यांनी २० एप्रिल २०२० रोजी काढलेल्या आदेशानुसार बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात २० हजारांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तरुण डॉक्टरांच्या मानधनातील ही कपात अन्यायकारक असून त्यामुळे बंधपत्रित वैद्यकीय डॉक्टरांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे” असे अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.  खरं तर सद्य परिस्थितीत त्यांच्या सेवेचं मोलच होऊ शकत नाही, त्यांच्या परिश्रमाच मोल त्यांना अधिक भत्ता देऊन करायला हवं, मानधन कमी करून नाही अशी मागणी अमित ठाकरे यांनी सरकारकडे केली  आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार