सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील कळंब इथे शिवशाही बसचा अपघात झाला

या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Aishwarya Dubey
  • Aug 24 2020 9:11AM

राज्यात कोरोनाचं संकट असताना रविवारी मात्र मोठ्या उत्साहात भाविकांनी दीड दिवसाच्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. सगळीकडे साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत असताना पुण्यात रविवारी रात्री भीषण घडला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील कळंब इथे रविवारी रात्री 10 च्या सुमारास शिवशाही बसचा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हर टेक करताना शिवशाही बस महामार्गावरच उलटली झाली. बस पलटी झाल्याने अपघात 8 ते 10 जण जखमी किरकोळ जखमी झाले तर या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कळंब कॉलनीजवळ नाशिकवरून पुण्याकडे ही बस येत होती. बसमध्ये 8 ते 10 प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मंचर इथल्या खाजगी रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले.

याआधी वारंवार शिवशाही बसचा अपघात घडल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर एसटी बसचा हा पहिलाच अपघात घडला असल्याने या वाहतूक व्यवस्थेने प्रवास करावा की नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटातही अपघात झाला होता. दुचाकी व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते.

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर मालवाहतूक ट्रक पलटी झाला. तसंच दुचाकीवरील दोघे खाली पडून जखमी झाले. या दोघांनाही राजगुरुनगर पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. घाट परिसरात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे वाहनं सावकाश चालवा अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार