सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात महिलेने दिला तिळ्यांना जन्म आईसह तिन्ही बाळ सुखरुप;स्त्रीरोग तज्ज्ञांकडून यशस्वी प्रसुती

माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता एका 28 वर्षीय महिलेने एकाच वेळी तिळ्यांना जन्म दिला. यामध्ये दोन मुली तर एक मुलाचा जन्म झाला असून बाळंतीनसह तिन्ही बाळ सुखरुप आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट व त्यांच्या चमुने सिझेरीयन शस्त्रक्रियेव्दारे ही प्रसुती यशस्वी केली

s.ranjankar
  • Sep 10 2021 2:50PM

 

 

लातूर:  माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता एका 28 वर्षीय महिलेने एकाच वेळी तिळ्यांना जन्म दिला. यामध्ये दोन मुली तर एक मुलाचा जन्म झाला असून बाळंतीनसह तिन्ही बाळ सुखरुप आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट व त्यांच्या चमुने सिझेरीयन शस्त्रक्रियेव्दारे ही प्रसुती यशस्वी केली.

अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी येथील भाग्यश्री चंद्रकांत केंद्रे (वय 28 वर्ष) यांची यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट यांनी नियमीत तपासणी केली असता त्यांच्या गर्भात तिळे असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. दरम्यान भाग्यश्री केंद्रे यांना प्रसुतीची लक्षणे व त्यांच्या गर्भात तिळे असल्यामुळे अत्यावश्यक बाब म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञांनी सिझेरीयन पध्दतीने ही प्रसुती करण्याचा निर्णय घेतला.

स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे, डॉ. रोशनी अकुसकर यांनी दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता भाग्यश्री केंद्रे यांची सिझेरीयन पध्दतीने कुठल्याही अडथळ्याविना ही प्रसुती यशस्वीपणे पुर्ण केली. यामध्ये भाग्यश्री केंद्रे यांनी एकाच वेळी तीन गोंडस बाळांना जन्म दिला असून यात पहिल्या दोन मुली तर एक मुलगा अशा तीन बालकांचा जन्म झालेला आहे. यामध्ये पहिल्या नवजात बालकाचे वजन 1 किलो 800 ग्राम, दुसऱ्या बालकाचे वजन 1 किलो 500 ग्राम तर ‍तिसऱ्या बालकाचे वजन 1 किलो 600 ग्राम एवढे आहे. सध्या आईसह तिनही बाळ सुखरुप असून दक्षता म्हणून तिन्ही नवजात बालकांना नवजात अतिदक्षता विभागात बालरोग तज्ज्ञांच्या निगरानिखाली ठेवण्यात आले आहे.

 या प्रसुतीसाठी डॉ. लक्ष्मी बाली, डॉ. श्रुती जायभाये यांनी सहाय्य केले तर भूल तज्ज्ञ म्हणून डॉ. संजय बेंबडे, डॉ. धिरज केंद्रे, बालरोग तज्ज्ञ म्हणून बालरोग विभाग प्रमुख डॉ. विद्या कांदे, डॉ. अखिलेश अंजन, डॉ. सोनल रे, परिचारीका सुषमा देवकते यांनी काम पाहिले.


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार