सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी नाही.-- फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज या मुद्द्यांवर अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली मते मांडली. भाजपकडून कोणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Snehal Joshi .
  • Aug 16 2020 9:22PM
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास, पवार कुटुंबातील कलह आणि करोना संकट हे तीन मुद्दे सध्या राज्यात केंद्रस्थानी असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज या मुद्द्यांवर अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली मते मांडली. भाजपकडून कोणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.बिहारच्या निवडणुकांमुळेच सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी राजकारण केलं जात आहे. मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्याचे तेच कारण आहे, असा गंभीर आरोप राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या अनेक नेत्यांनी केला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्यासोबत पाच वर्षे काम केले ते महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस अचानक अक्षम कसे झाले, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला होता. त्यावर फडणवीस यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले. 'महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पाच वर्षे मी या पोलिसांसोबत काम केले आहे. त्यांची क्षमताही मला माहीत आहे. केवळ अनेकदा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात आणि त्यांनी दडपण घेऊन काम करू नये इतकीच आमची अपेक्षा आहे', असे फडणवीस यांनी नमूद केले. महाराष्ट्र व बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही. बिहारच्या तुलनेत महाराष्ट्र पोलीस उजवेच आहेत, असेही फडणवीस म्हणाले. सुशांतसिंह प्रकरणी तपासाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईलच. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य नको, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना आजोबा शरद पवार यांनी कठोर शब्दांत फटकारले आहे. पार्थच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असे पवार म्हणाले आहेत. त्यावरून पवार कुटुंबात बरीच अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्याबाबत विचारले असता, हा पवार कुटुंबाचा अंतर्गत विषय आहे. त्यात आम्हाला पडायचे नाही, असे फडणवीस म्हणाले. सुशांत प्रकरणावरून भाजपचे एक पदाधिकारी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने पत्रकारांनी विचारणा केली असता भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार