सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अद्याप करोनाला गावात प्रवेश करू न दिलेले गाव “ गडद “

गेल्या वर्षी करोना आजार आल्या नंतर गावकर्यांनी दक्षता घेतली मासचा वापर केला.

Sudarshan MH
  • May 31 2021 5:51PM


गेल्या वर्षी करोना आजार आल्या नंतर गावकर्यांनी दक्षता घेतली मासचा वापर केला. विषेशता प्रत्येक व्यक्तीत सुरक्षित सामाजिक अंतर ठेवले गेले. “गडद” गावची लोकसंख्या बाराशे आहे व शेकडो गडद गावचे लोक मुंबई-पुणे किंवा पर गावात रोजगारासाठी गेले आहेत. 
पहिल्या करोना लाटेत मुंबई-पुण्या वरून आलेल्या गावकर्यांन मार्फत करोना गावात येऊ नये म्हणुन त्यांना गावात आल्यावर प्रथम जिल्हा परिषदेच्या शाळेत चौदा दिवस विलीगीकरण कक्षात ठेवण्यात येत होते. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी त्यांचेवर देखरेख करत असत. अशा प्रकारे गेल्या वर्षी पहिल्या लाटेत “गडद” ग्रामस्थांनी करोनाला दूर ठेवले.
करोनाची दुसरीलाट मोठी आहे या लाटेत अनेक जणांना करोना झाला व या लाटेत मृत्युदर ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे 
पण या दुसर्या लाटेचा काहीही परिणाम गडद गावावर झाला नाही. करोना बाबतच्या नियमांचे काटेकोर पणे पालन केल्या मुळे दसर्या लाटेचा काहीही परिणाम गडद गावात झाला नाही. 
गडद गावात अद्याप पर्यंत कोणाला ही करोनाचा संसर्ग झाला नाही करोना आजारा पासुन “ गडद” गाव अद्याप पर्यंत दूर आहे.
गावकर्यांनी विना कारण घराबाहेर पडू नये. आवश्यक असेल तर बाजाराच्या गावाला जावे पण जाताना तोंडाला मास लावावा आणी सेनेटाईझर बाटली सोबत ठेवावी.
आपले कोणी नातेवाईक गावात आले तर त्यांना काही दिवस विलीगीकरण कक्षात ठेवावे आणी दैनंदिन व्यवहार करताना सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे. ईतके नियम जरी पाळले तरी आपण आपल्या गावाला करोना पासुन दूर ठेऊ शकतो हे “ गडद” गावाने दाखवून दिले आहे.



पुणे शहर आणी पुणे ग्रामीण मध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो आहे. मृत्यूदर ही वाढला आहे. अशा परिस्थितीत “गडद” गावातील ग्रामस्थांनी स्वयं शिस्तीने करोना आजाराला गावात शिरकाव करू दिला नाही. गेल्या वर्षी मी स्व:ता गावी गेलो होतो तेव्हा मला ही चौदा दिवस होम कॅारन्टाईन व्हावे लागले होते. आता ही गावी गेलो की गावच्या नियंमांचे पालन करावे लागते. या नियंमांचे पालन केल्या मुळे गावात करोनाचा शिरकाव होऊ शकला नाही.
या साठी महत्वाची भुमीका बजावली ती गावच्या तरूणांनी त्यांना गावचे सरपंच,पाटील व ग्रामपंचायत यांनी सर्वोतोपरी मदत केली म्हणुन हे शक्य झाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार