सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वसईत अवतरली पाईपलाईन गॅसगंगा - नऊ वर्षांच्या प्रयत्नांनंतर घरोघरी पाईपलाईन गॅस - बहुजन विकास आघाडीच्या प्रयत्नांना यश

वसई - नऊ वर्षांपासून सुरू असलेला पत्रव्यवहार, मागणी-विनंती अर्ज आदी प्रयत्नांनंतर अखेर वसईच्या अंगणी पाईपलाईन गॅसगंगा अवतरली. वसईच्या एव्हरशाईन नगर या रहिवासी संकुलात जिल्ह्यातील पहिलीवहिली पाईपलाईन गॅस जोडणी मंगळवारी झाली आणि वसईकरांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं.

Sudarshan MH
  • Feb 23 2021 3:28PM
वसईत अवतरली पाईपलाईन गॅसगंगा - नऊ वर्षांच्या प्रयत्नांनंतर घरोघरी पाईपलाईन गॅस - बहुजन विकास आघाडीच्या प्रयत्नांना यश. वसई नऊ वर्षांपासून सुरू असलेला पत्रव्यवहार, मागणी-विनंती अर्ज आदी प्रयत्नांनंतर अखेर वसईच्या अंगणी पाईपलाईन गॅसगंगा अवतरली. वसईच्या एव्हरशाईन नगर या रहिवासी संकुलात जिल्ह्यातील पहिलीवहिली पाईपलाईन गॅस जोडणी मंगळवारी झाली आणि वसईकरांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. पाईपलाईन गॅससाठीच्या या लढ्यात बहुजन विकास आघाडीने शर्थीचे प्रयत्न केले होते. या पहिल्या जोडणीचे उद्घाटन माजी महापौर आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्या प्रविणा ठाकूर यांनी केले. बहुजन विकास आघाडीचे पालघरमधील माजी खासदार बळीराम जाधव यांनी २०१२ मध्ये पहिल्यांदा पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाला पत्र पाठवलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी वसई, विरार, पालघर आणि इतर भागांमध्ये सीएनजी आणि पाईपलाईन गॅसची जोडणी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर बहुजन विकास आघाडीने या प्रकरणी वारंवार पत्रव्यवहार आणि प्रसंगी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने देणं सुरूच ठेवलं होतं. अखेर नऊ वर्षांच्या प्रयत्नांनंतर मंगळवारी जिल्ह्यातील पहिली पाईपलाईन गॅस जोडणी वसईत झाली. एलपीजीपेक्षा पाईपलाईन गॅस स्वस्त असल्याने या जोडणीमुळे जनसामान्यांना दिलासा मिळणार आहे. दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ अशा गोष्टींनी सर्वसामान्य लोक जेरीला आले आहेत. त्यात आता तुलनेने स्वस्त पाईपलाईन गॅस मिळाल्याने ही त्यांच्यासाठी सुखद झुळूक आहे. हे पाईपलाईन गॅसचं जाळं लवकरच संपूर्ण वसई तालुक्यात आणि त्यापुढे जिल्ह्यात पसरेल. बळीराम जाधव यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानू तेवढे थोडे आहेत, अशी प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीचे नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी दिली. गेल्या नऊ वर्षांच्या काळात संबंधित मंत्रालय आणि नियामक मंडळ यांना हजारो पत्रं लिहिली होती. जिल्ह्यातील आणि तालुक्यातील लोकांना आम्ही पाईपलाईन गॅसचं वचन दिलं होतं. हे वचन आम्ही पूर्ण करू शकलो, याचा आनंद आहे, असं बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं. पाईपलाईन गॅसचे फायदे- सिलिंडरपेक्षा कमी दरात पुरवठा - २४ तास विनाखंडित गॅसपुरवठा - सुरक्षित वापर - बचतीचा उत्तम मार्ग - पर्यावरणावर किमान विपरित परिणाम ।

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार