सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आम्ही आपल्या सोबत आहोत...पालकमंत्री राऊत

कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज पालकमंत्र्यांनी भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे कुटुंबाचे सांत्वन केले

Snehal Joshi .
  • Aug 9 2020 6:29PM
पुत्र वियोगाचे दु:ख हे न पेलवणारे आहे, काळजी घ्या,आम्ही आपल्या सोबत आहोत. या शब्दांत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज विंग कमांडर दीपक साठे यांच्या आई-वडीलांना धीर दिला. कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज पालकमंत्र्यांनी भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे कुटुंबाचे सांत्वन केले व धीर दिला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार,पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. वैमानिक विंग कमांडर दीपक यांचे वयोवृद्ध वडील कर्नल वसंत साठे, आई नीला साठे तसेच काका काकू यावेळी उपस्थित होते. विंग कमांडर दीपक साठे यांनी प्रसंगावधान राखत स्वत:चा जीव धोक्यात घालुन इतर प्रवाशांचे प्राण वाचवले .नागपूरच्या या सुपुत्राचा नागपूरकरांना नेहमी अभिमानच राहील असे पालकमंत्री म्हणाले. टेबलटॉप असलेल्या विमानतळावरच्या लँडिंग करतेवेळी अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती त्यांची आई नीला साठे यांनी यावेळी केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार