सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर शहरातील रंगावली नदीपात्र स्वच्छता बाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले

नवापूर शहरातील रंगावली नदीपात्रातील पाणी नागरिकांना पिण्यासाठी आणि नदीपात्र हिंदूधर्मियांच्या आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांच्या मूर्ती विसर्जनाच्या विधीसाठी नगरपरिषद द्वारे उपलब्ध करून दिले

Nandurbar MH
  • Sep 7 2021 11:42AM

 नवापूर शहरातील रंगावली नदीपात्रातील पाणी नागरिकांना पिण्यासाठी आणि नदीपात्र हिंदूधर्मियांच्या आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांच्या मूर्ती विसर्जनाच्या विधीसाठी नगरपरिषद द्वारे उपलब्ध करून दिले जाते परंतु आता हे नदीपात्र संपूर्ण दूषित झाल्याने वरील दोघे कामासाठी हे पाणी योग्य नाही. म्हणून संपूर्ण हिंदू धर्मीय बांधव अत्यंत नाराज झाले आहेत तरी आपणास विनंती करण्यात येते की श्री गणपती विसर्जन दिनाच्या पूर्वी आपण योग्य ती व्यवस्था उभी करत रंगावली नदी पात्रातील कचरा, वाहून आलेले हिरवळ, शेवाळ, पशु पक्षाच्यां कत्तली नंतरची घाण , प्लास्टिक कचरा घाणेरड्या वस्तू संपूर्ण रीतीने काढून टाकण्यात यावी. तसेच नदीपात्रा पर्यंत येणे जाण्याच्या मार्गावर मार्किंग करून रहिवाशांना देखील 24/7 तत्वावर सूचना मिळत राहतील व पुन्हा येथे कोणी कचरा करण्यास पण जाणार नाही. हिंदू धर्म निसर्ग पूजक आहे रंगावली नदीला येतील लोक दैव रूपात पूजन करतात त्यात त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची सार्वजनिक बांधिलकी नगर प्रशासनाने पण पाळावी जेणेकरून सार्वजनिक शांतता व समरसता टिकून राहिल. यासाठी जर नगरपरिषद नियमांमध्ये जर काही कार्यपद्धती नमूद नसेलही तरी आपण नवापूर नगरपरिषद सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, पाणी सभापती, इत्यादींना या पत्राद्वारे कळवून श्री गणपती विसर्जन दिनाच्या आधी तसा ठराव करून सर्व व्यवस्था तत्काळ उभी करावी व नवापूरकरांना विकास कार्य स्वच्छता कार्य करून देण्यात यावे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार