सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मुंबई विद्यापीठाला भेट

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या इमारती बांधून पूर्ण आहेत. मात्र ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय त्या पडून आहेत

Sudarshan MH
  • Jun 30 2021 5:00PM

*विद्यापीठातील इमारतींना यथाशीघ्र ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबद्दल राज्यपालांच्या अधिकाऱ्यांना सूचना*
 
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या इमारती बांधून पूर्ण आहेत. मात्र  ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय त्या पडून आहेत. ही राष्ट्रीय संपदेची नासाडी आहे असे नमूद करून इमारतींमधील त्रुटी दूर करून विद्यापीठाला इमारतींच्या वापराबाबत  नाहरकत व भोगवटा प्रमाण पत्र यथाशीघ्र देण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महानगरपालिका व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
 
विद्यापीठाच्या ३८ इमारती महानगरपालिका व अग्निशमन विभागाच्या ना हरकत व भोगवटा प्रमाणपत्राशिवाय पडून आहेत याबाबत राज्यपालांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
 
राज्यपाल कोश्यारी यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला भेट दिली व विविध विभाग व इमारतींची पाहणी केली.  त्यानंतर विद्यापीठातील अधिकारी व पालिका अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी वरील सूचना दिल्या.
 
विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत उपयोगात नसलेल्या पडीक इमारती व वापरात नसलेल्या इमारती यांबाबत देखील सविस्तर माहिती देण्याच्या सूचना राज्यपालांनी विद्यापीठाला दिल्या.
 
कलिना परिसर येथे मुंबई विद्यापीठातर्फे सुरु असलेले नवीन परीक्षा भवन, ग्रंथालय भवन, आंतर राष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह व नवे मुलींचे वसतिगृह व भावी योजना याबाबत सादरीकरण देण्यात आले.
 
राज्यपालांनी यावेळी डॉ. आंबेडकर भवन, नॅनो सायन्स व नॅनो टेकनॉलॉजी केंद्र, इन्क्युबेशन फॉर डेव्हलपिंग आंत्रप्रेन्युअरशिप अँड स्टार्ट अप केंद्र, हरित तंत्रज्ञान भवन, स्कुल ऑफ बेसिक सायन्सेस, नवे परीक्षा भवन व जवाहरलाल नेहरू ग्रंथालय येथे भेट दिली तसेच प्रयोगशाळा व ग्रंथालयाची पाहणी केली. 
 
कुलगुरू पेडणेकर यांनी राज्यपालांचे विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरची प्रतिकृती भेट देऊन स्वागत केले. बैठकीला प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख व अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. 

**
 
*Governor Bhagat Singh Koshyari visits University of Mumbai*

*Governor asks Municipal officials to give early clearances for completed University buildings*
 
Terming the non granting of NOC and Occupancy Certificate to completed buildings of University of Mumbai a wastage of national resources, Governor Bhagat Singh Koshyari today asked officials of Municipal Corporation and Fire Brigade to provide early clearances to completed university buildings.
 
The Governor expressed strong displeasure that 38 buildings of the University are lying unused in absence of NOC from Fire Department and Occupancy Certificate from the BMC.
 
Governor Koshyari today paid his second visit to the Kalina Campus of the University of Mumbai during which he visited various departments and buildings of the University. The Governor gave instructions to the officials during a meeting with University authorities and officials of BMC and Fire Department. 
 
A presentation was made before the Governor on the Major Projects and Future plans of the University for the strengthening of the University. The Governor was also apprised of the work of the new Examination Building, New Library Building, International Students Hostel and the New Girls Hostel, Development of the Master Plan of Heritage Conservation and Solar Energy Project.  
 
The Governor visited the Dr Ambedkar Bhavan, the National Centre for Nano Science and Nano Technology, Incubation for Developing Enterprenerushp and Start Up Centre,, Green Technology Building, the School of Basic Sciences, the New Examination Building and the Knowledge Resource Centre of the University. The Governor visited the Laboratories and the Jawaharlal Nehru Library where he inspected the rare manuscripts and collection.  
 
Vice Chancellor Dr Suhas Pednekar presented a replica of the Rajabai Tower to the Governor. The meeting was attended by Pro Vice Chancellor Prof Ravindra Kulkarni, Registrar (IC) Baliram Gaikwad, Deans of various faculties and members of the University authorities.
  
*

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार