सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

१५ जून २०२१ पर्यंत मालमत्ता कर भरल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये १० टक्के सूट.

नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन.

Sudarshan MH
  • Apr 17 2021 12:17PM


नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन.

ठाणे - ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते दिनांक १५ जून २०२१ पर्यत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची एकत्रित रक्कम महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये ( अग्निशमन कर वगळता ) १० टक्के सूट देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला असून सर्व करदात्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके जनरेट करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याकरिता महापालिकेच्या संकेस्थळावर ई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  या ई -सुविधेमार्फत करदाते ऑनलाईन पद्धतीने जमा करून प्रिंट घेवू शकतात.

सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता संसर्ग आणि शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष बिले वितरित होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब विचारात घेता करदात्यांनी महापालिकेच्या ई-सुविधेद्वारे मालमत्ता कर भरण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. दिनांक १५ जून २०२१ पर्यत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची एकत्रित रक्कम महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये (अग्निशमन कर वगळता ) १० टक्के सूट देण्यात येणार आहे, तर १६ जून ते ३० जून २०२१ पर्यंत ४ टक्के १ जुलै ते ३१ जुलै पर्यंत ३ टक्के आणि १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत २ टक्के सूट देण्यात येणार आहे.

नागरिकांना महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या डीजीठाणे या डिजिटल प्रणालीद्वारे देखील मालमत्ता कर जमा करण्याची अतिरिक्त सुविधा उपलब्ध आहे. सर्व मालमत्ताधारक नागरिकांनी आपला कर वेळेत भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार