सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नगर-संभाजीनगर महामार्गावर भयंकर अपघात; पाच ठार

अहमदनगर: -संभाजीनगर महामार्गावर तालुक्यात देवगड

Sudarshan MH
  • Feb 22 2021 3:41PM
--------
अहमदनगर: -संभाजीनगर महामार्गावर तालुक्यात देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार झाले. हा अपघात आज पहाटे दोनच्या सुमारास झाला. कारमधील मृत जालना जिल्ह्यातील आहेत. या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार यातील स्वीफ्ट कार (क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) औरंगाबादहून नगरकडे येत होती. देवगड फाट्याजवळ नगरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसशी (एमएच १९ वाय ७१२३) तिची धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. ते सर्वजण जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते. अपघातात कार बसच्या समोरील बाजूने घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तुरळक होती. या अपघाताची माहिती समजताच नेवाशाचे फौजदार भरत दाते यांनी आपले सहकारी पोलिस कर्मचारी अशोक नागरगोजे, बबन तमनर, दिलीप कुऱ्हाडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तेते स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार