सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सॅरेक्स कंपनीत भीषण स्फोट, ३ कि.मी. च्या परिसरात पसरला आवाज !

तारापूर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में, सॅरेक्स ओव्हरसिज लि. या कंपनीत सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास झाला स्फोट, या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, याचा आवाज जवळपास तीन कि.मी. पर्यंत ऐकला गेला.

Sudarshan MH
  • May 30 2021 10:01AM


तारापूर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में, सॅरेक्स ओव्हरसिज लि. या कंपनीत सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास 
झाला स्फोट, या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, याचा आवाज जवळपास तीन कि.मी. पर्यंत ऐकला गेला. 

या आवाजाने घाबरून आजू बाजूच्या कारखान्यातील कामगार आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर आले होते. 
स्फोटाची तीव्रता इतकी भयानक असताना ही कंपनी व्यवस्थापणाने याची माहिती आपत्ती व्यवस्थापण, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस स्टेशन यांना न देताच सर्व प्रकरण दाबत, सर्व कामगारांच्या सुरक्षिततेशी व जीवाशी खेळ केल्याचे उघड झाले आहे. 

सोशल मिडीयावर याबाबत माहिती पसरताच बोईसर एमआयडीसी पोलीसांनी घटना स्थळाला भेट दिली असता, प्लास्टिकच्या रिव्हिंग टॅकमध्ये नायट्रिक व व्हॅक्यूमचा दबाव वाढिल्याने हा स्फोट झल्याचे व कोणती ही जीवतहानी वा नुकसानी झाली नसल्याबाबत पोलीसांना कंपनी व्यवस्थापनाने सांगितल्याचे समजते. 

"यासर्व प्रकाराबाबत कंपनीशी संपर्क साधला असता कंपनीकडून कोणताही माहिती देण्यात आली नाही." 

||मागील वर्षी जानेवारी महिन्यात याच कंपनीचे घातक रसायन, शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वाणगांव परिसरातील साखरा डॅममध्ये रात्रीच्या वेळी टॅकरव्दारे सोडताना पकडण्यात आले होते. त्यावेळी ही कंपनीने माहिती लपविण्याचा व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे या स्फोट प्रकरणाबाबत अनेक तर्क वितर्क वर्तविण्यात येत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार