सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संभाजी ब्रिगेड च्या वतीने हदगाव येथे रास्ता रोको आंदोलन

हदगाव येथे संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सुभाष कोल्हे यांच्या

Sudarshan MH
  • Oct 24 2020 10:15AM
हदगाव दि.२३(अरविंद जाधव) हदगाव येथे संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सुभाष कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा, शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ पन्नास हजार हेक्टरी मदत द्यावी, पीक कर्जापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा यासह अनेक मागण्यांसाठी हदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. आज हदगाव येथील बाजार असल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. येणाऱ्या काळात आमच्या या मागण्या सरकारने मान्य नाही केल्या तर यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही छेडु असा इशारा सुभाष  कोल्हे यांनी सरकारला दिला. यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव परमेश्र्वर पाटील जिल्हा प्रवक्ता गजानन इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष राम आनकाडे जिल्हा संघटक प्रभाकर सुर्यवंशी तालुकाध्यक्ष किरण वानखेडे,. गोविंद कौशल्य राजू पाटील वानखेडे गजानन पाटील देवसरकर संदीप पाटील गुरफळी कर नामदेव पाटील कोथळे कर परमेश्वर पाटील वाळकी कर अरुण पाटील हरण संतोष पाटील माने व सर्व माझे सहकारी मित्र सर्व उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार