सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांशी गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही - खासदार हेमंत पाटील ; दिशा बैठकीत स्टेट बँक अधिकाऱ्याला खडसावले

दिशा बैठकीत स्टेट बँक अधिकाऱ्याला खडसावले

Sudarshan MH
  • Oct 22 2020 11:38AM
नांदेड: दि.21(अरविंद जाधव)शेतकऱ्यांशी उद्धटपणे गैरवर्तन करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना संस्काराची गरज असून  यापुढे शेतकऱ्यांशी गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. बँकेला जिल्ह्यात व्यवहार करायचे असतील तर सर्वसामान्य जनतेला सन्मानाने वागविले पाहिजे अन्यथा परवाना रद्द करण्यासाठी रिजर्व बँकेला सूचना करू अश्या कडक शब्दात खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा अग्रणी  बँकेच्या अधिकाऱ्यांना खडसावले. सोबतच पिककर्जाचे केवळ 30 टक्के वाटप केले असून हे वाटप यंदाच्या खरीप हंगामातील अत्यंत कमी आहे. याबाबत तात्काळ खुलासा करावा असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

            नांदेड येथे आज (दि.21) जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती अर्थात दिशा समिती बैठक  आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीला 
सहअध्यक्ष खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष  खासदार प्रताप पाटील चिखलीकर,आ.राजेश पवार, आ.भीमराव केराम, आ.तुषार राठोड,आ.राम पाटील रातोळीकर,जिल्हाधिकारी,सदस्य सचिव डॉ.विपीन इटनकर,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
         गोदावरी नदी स्वच्छता, हिंगोली लोकसभा मतदार संघातून जाणाऱ्या  361 आणि 161  राष्ट्रीय महामार्गावरील खड्यामुळे होणारे ,अपघात घरकुल योजना ,दोन दिवसाआड नांदेड शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा,नांदेड शहरातील ड्रेनेज लाईनचा गंभीर प्रश्न,संजय गांधी निराधार योजनेचे निधी वाटप , जिल्ह्यातील किनवट,माहूर,  हदगाव, हिमायतनगर,या तालुक्यात  अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे,पीकविमा  तक्रारी बाबत तालुका  स्तरावर कार्यालये सुरू करून प्रशासनाकडून लोक अदालत घेण्यात यावी आणि नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायती अंतर्गत प्रलंबित घरकुल निधी या प्रश्नावर खासदार हेमंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आणि याबाबतचे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
नांदेड दिशा कमिटीची बैठक तीन वर्षांनंतर होत असल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित होते  त्या सर्वच महत्वाच्या प्रश्नांना खासदार हेमंत पाटील यांनी प्राधान्य देऊन उपस्थित केले.गोदावरी नदी स्वच्छतेसाठी तत्कालीन नांदेड दक्षिणचा मी  आमदार  असताना तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम याच्याकडून  18 कोटींचा निधी मंजूर केला होता त्याबाबतच तपशील मनपा आयुक्तांना मागवून  यावर काय कारवाई करण्यात आली याबाबतच अहवाल मागविला आणि गोदावरी नदी अस्वच्छतेबाबत  नाराजी व्यक्त केली.  सद्य स्थितीला  हिंगोली मतदार संघातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून केवळ 6 महिन्यात खड्डे पडले  आहेत यामुळे आतापर्यन्त 13 लोकांचा मृत्यू झाला आहे , याबाबत अनेक वेळा अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या आहेत परंतु कारवाई होत नाही त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि याबाबत चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मागणी  करताच समिती अध्यक्षांनी मान्यता दिली.पीकविमा प्रश्नी खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना  कमी कर्ज वटपाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. सोबतच नांदेड शहराच्या पाणी प्रश्नावर सुद्धा बोलताना ते म्हणाले की, सगळीकडे पूर परिस्थिती अतिवृष्टी झालेली असताना ऐन पावसाळ्यात मात्र नांदेड महानगरपालिका एक दिवसाआड पाणी पुरवठा करते यावर नाराजी व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यातील अनेक नगर परिषद आणि नागरपंचायती  अंतर्गत घरकुल योजनेचा निधी प्रलंबित असून त्यात प्रामुख्याने किनवट ,माहूर ,हदगाव ,हिमायतनगर तालुक्याचा घरकुल प्रश्न उपस्थित करून यासाठी मी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले. तसेच वाळू  तस्करांनी रेतीचे भाव गगनाला भिडविले असून सर्वसामान्य जनतेला ते परवडणारे नाहीत त्यामुळे यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण मिळवावे असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.खासदार हेमंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या अनेक महत्वपूर्ण प्रश्नांनी दिशा समितीची बैठक विशेष ठरली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार