सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हरी ओम नगर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण कार्यक्रमाने भाजपा सेवा सप्ताहाची सांगता..

चष्मे वितरण कार्यक्रमाने भाजपा सेवा सप्ताहाची सांगता..

Sudarshan MH
  • Sep 21 2020 11:39AM

कोल्हापूर -  पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने सुरु असलेल्या सेवा सप्ताह कार्यक्रमांची सांगता

आज हरी ओम नगर येथील वरद विनायक गणेश मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण कार्यक्रमाने करण्यात आली.

  गेली एक आठवडा रुग्णालये, गरीब वस्त्यांमध्ये फळे वितरण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण

, वृक्षरोपण, दिव्यांगांना कृत्रीम उपकरणे असे विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात हा सेवा सप्ताह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी यशस्वी केला. 
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी

, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, नगरसेवक किरण नकाते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत माता प्रतिमेचे पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा लोकांना मदत करणे, सेवा पुरवणे हा स्थायी भाव असल्यामुळे आपण त्यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत आहोत. आज रविवार सुट्टी असून देखील नेत्र तपासणीसाठी डॉक्टर याठिकाणी उपस्थीत आहेत त्यांच्यासह कोरोना काळात गेली ६ ते ७ महिने डॉक्टर, मेडिकल अशा विविध क्षेत्रात काम करणारे लोक आजही मोठ्या धैर्याने लोकांची सेवा करत आहेत अशा कोरोना योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले. यानंतर त्यांनी उपस्थित नेत्र तपासणी डॉक्टरांशी चर्चा करून सुरु असलेल्या नेत्र तपासणी शिबिराची माहिती घेतली. 
आजच्या या उपक्रमास जवळपास १५० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती दर्शवून नेत्र तपासणी करून घेतली. यासाठी लायन्स आय हॉस्पीटल, कोडोली येथील डॉ.सागर येझरे व सविता येझरे यांनी नेत्र तपासणीसाठी आलेल्या लोकांचे नेत्र तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार