सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

म्हसने फाटा नवीन midc तील एन.के.मिंडा कंपनीविरोधात आपेधुप ग्रामस्थांचा आक्रोश ...सोमवारी गेटबंद आंदोलनाचा ईशारा ......

गरज सरो वैद्य मरो' म्हणीचा आपधूप ग्रामस्थांनी घेतला अनुभव

Sudarshan MH
  • Sep 19 2020 12:25PM
अहमदनगर(रावसाहेब पारधी)
पारनेर   गरज सरो वैद्य मरो' म्हणीचा आपधूप ग्रामस्थांनी घेतला अनुभव. 
    तालूक्यातील म्हसनेफाटा येथे नवीन औद्योगीक वसाहत निर्मान होत आहे.औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी अधिग्रहन करताना मात्र स्थानिकांना मोठमोठी स्वप्ने दाखविली व नंतर विसरून गेले.म्हसने फाटा येथील नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये आपधूपचे युवकाना काम देन्यासाठी डावलले जात असल्याचा आरोप आपधुप येथील ग्रामस्थांनी केला असुन कंपनीविरूद्ध सोमवारी गेटबंद आंदोलनाचा ईशारा देन्यात आला आहे. तसे निवेदन कंपनी प्रशासन,समाजसेवक अन्ना हजारे,पारनेर प्रांताधिकारी,पोलीस निरीक्षक पारनेर,तहसिलदार यांना देन्यात आले आहे.
            जेव्हा जमिन अधिग्रहन करन्यात आले तेव्हा जमिनी देन्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला होता परंतु तत्कालीन प्रांताधिकारी व औद्योगिक वसाहतीच्या अधिकार्यांनी शब्द दिला होता की ज्यांच्या जमिनी जातील त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तिला कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीवरती घेण्यात येईल.
     तसेच आपेधुप परीसरात जेवढ्या कंपन्या होतील त्यांत गावातील युवकांना प्राधान्य देन्यात येईल.असे आश्वासन देन्यात आले होते.
           असे असतानाही यु.नो.मिंडा प्रा.लि.कंपनीने सर्व नियम डावलून काम चालु केले आहे.भुमीपुत्रांना डावलले गेले आहे,त्यामुळे गावामध्ये युवकांना रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढली आहे.याबाबत कंपनी प्रशासनाकडून फक्त आश्वासने दीली गेली त्यामुळे ग्रामस्थ कंपनीविरोधात एकवटले आहेत तसे निवेदन देताना आपधुप तंटामुक्ती अध्यक्ष संतोष भगवान गवळी ,पुष्कराज गवळी ,शरद गवळी,सागर गवळी,सुरज गावडे,पोपट चव्हान,शरद पवार,गौरव गवळी ऊपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार