सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा समाजातील विद्यार्थी तरुणांचे सरकारने नुकसान होऊ देऊ नये : राष्ट्रीय वारकरी परिषद

मराठा आरक्षणाला स्थगिती हा निर्णय मराठा समाजातील

Sudarshan MH
  • Sep 17 2020 5:12PM
संभाजीनगर :- मराठा आरक्षणाला स्थगिती हा निर्णय मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. नुकतेच विविध शाळा महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झालेल्या आहे अनेक गरजुवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आरक्षणाचा लाभ मिळणार होता मात्र आता या निकालाने विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते.
      आरोग्य, पोलीस तसेच विविध सरकारी क्षेत्रातील नोकर भरती सुद्धा सुरु होण्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून येत आहे अशा स्थितीत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजाचे फार मोठे नुकसान होणार आहे. गाव खेड्यातील शेतकरी वर्गातील मराठा समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. 
              वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची मराठा समाजाची दयनीय स्थिती आम्ही जवळून बघत आहोत. यासाठी मराठा क्रांती मोर्च्यास आमचा जाहीर पाठींबा आहे.
           सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजातील विद्यार्थी तरुणांचे शिक्षण व नोकरीच्या संदर्भात नुकसान होऊ देऊ नये. काहीतरी ठोस निर्णय घेऊन शिक्षण व नोकरतील आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार