सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ABVP च्या सातत्यपूर्ण लढयाला यश

कोरोना वर्षात विद्यार्थ्यांचे संपूर्ण कॉलेज शुल्कात होणार कपात, सोबत परीक्षा शुल्काचाही होणार परतावा

Sudarshan MH
  • Sep 17 2020 11:46AM
कोविड -१९ व त्यानंतर निर्माण झालेल्या विविध शैक्षणिक समस्यां ABVP ने वेळोवेळी निवेदन-चर्चाच्या माध्यमातून विद्यापीठे व शासनासमोर निदर्शनास आणून दिल्या, याकरीता राज्यातील सर्वच विद्यापीठात ABVP ने मोर्चे / आंदोलने करून विद्यार्थी हिताच्या मागण्या मान्य करून घेतल्या, परंतु राज्य सरकारने यात संपूर्ण महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण संदर्भात ठोस भूमिका घ्यावी अशी सरकारकडे अभाविपची आग्रही मागणी होती.

अभाविपच्या वारंवार केलेल्या आंदोलने, मागण्या व पाठपुराव्याच्या आधारे मा. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते, त्यात संबंधित विभागातील अधिकारीही उपस्थित होते. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी  अभाविपच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत खालील प्रस्तावित निर्णय घेण्याकरीता व त्यांची अंमलबजावणीसाठी समितीची घोषणा केली, तसेच याबाबत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन सामंत यांनी अभाविप शिष्टमंडळाला बैठकी दरम्यान दिले.

१) महाविद्यालयांचे डेव्हलपमेंट शुल्क ५०% विद्यार्थ्यांचं कमी करण्यात येईल.

२) विद्यार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत उदा. ग्रंथालय, लॅब, जिमखाना शुल्क आकरण्यात येणार नाही.

३) सध्या परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांचे अधिकाअधिक परीक्षा शुल्क परत करण्यात येईल किंवा पुढील शैक्षणिक वर्षात वर्ग केले जाईल.

४) जी महाविद्यालये इंस्टॉलमेंटची (Installment) सुविधा विद्यार्थ्यांना देणार नाहीत,अशा महाविद्यालयांचा अहवाल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

५) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये व ती झाली असल्यास स्थगित करावी.

'विद्यार्थी हिताचा ABVP करीत असलेल्या संघर्ष आज दोन महिन्यांनी का होईना राज्याच्या मंत्र्यांना मान्य करावा लागला, अभाविप मागण्याना घेवून आज मंत्र्यांनी विशेष बैठकीचे आयोजन करत त्यांवर सकारात्मक चर्चाकेली, आजची चर्चा महत्वपूर्ण असून सरकार विद्यार्थी हिताच्या सोबत राहील,' अशी अपेक्षा यावेळी अभाविप राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी व्यक्त केली. 'अभाविपच्या सततच्या पाठपुराव्याने शैक्षणिक समस्यांबाबत शासनाने आज समिती गठीत केली आहे, बैठकीत झालेल्या सर्व प्रस्तावित निर्णयांच्या अंमलबजावणीची जवाबदारी समिती व सरकारची असेल व त्याबाबत योग्य ती पावले उचलली गेली नाहीत तर अभाविप तीव्र आंदोलन करेल.' असे वक्तव्य कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी केले

( सदर प्रसिद्धीपत्रक मुंबई येथून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. )

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार