सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कुंडलवाडीच्या नगराध्यक्षांना शासनाने ठरविले अपात्र

जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही

Sudarshan MH
  • Sep 9 2020 3:41PM
नांदेड, दि.८(अरविंद जाधव): जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नसल्याच्या कारणावरून कुंडलवाडीच्या नगराध्यक्षा अरुणा कुडमुलवार यांना पूर्वलक्षी प्रभावाने अपात्र ठरविण्यात येत असल्याचे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी (दि.७) काढले आहेत.
सौ. कुडमुलवार यांच्या जातीचा दावा मान्य करून त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी उमेदवाराने केलेली तक्रार जात प्रमाणपत्र तपासणीने बहुमताने फेटाळून लावली होती. परंतु त्या हैदराबाद येथून स्थलांतरित झालेल्या असल्याने त्यांच्या जात प्रमाणपत्राची तपासणी करता येत नसल्याचा निर्णय दिला होता. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेताना समितीच्या एका सदस्याने त्यांच्याविरुद्ध दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. दुसरीकडे त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारानेदेखील जात प्रमाणपत्र समितीचा निर्णय रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २०१८ साली सौ. कुडमुलवार यांच्या जात प्रमाणपत्राच्या कारणावरून होणाऱ्या संभाव्य कारवाईला स्थगिती दिली. डिसेंबर २०१९ मध्ये दोघांच्याही याचिकेवर अंतिम सुनावणी होऊन गेल्या १६ जून २०२० रोजी निर्णय पारित झाला. उच्च न्यायालयाने दोघांच्याही याचिका फेटाळून लावल्या. परंतु, पूर्वी दिलेली स्थगिती सुरू ठेवण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे सौ. कुडमुलवार यांना उच्च न्यायालयात मिळालेला दिलासा संपुष्टात आला. या निर्णयानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सौ. कुडमुलवार यांचे नगराध्यक्षपद भूतलक्षी प्रभावाने अनर्ह ठरविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.
दरम्यानच्या काळात सौ. कुडमुलवार यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुनरिक्षण करण्याचा अर्ज दाखल केला असता उच्च न्यायालयाने तो देखील गेल्या २ सप्टेंबर रोजी फेटाळून लावला. त्यानंतर शासनाने सौ. कुडमुलवार यांना पूर्वलक्षी प्रभावाने अनर्ह ठरविण्यात येत असल्याचे आदेश सोमवारी काढले.
सौ. कुडमुलवार ह्या डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या कुंडलवाडी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर जनतेतून मतदानाने निवडून आल्या होत्या. जिल्ह्यात त्यावेळी भाजपाच्या पूर्ण बहुमताच्या त्या एकमेव नगराध्यक्षा होत्या.
त्यांच्या पदाचा कालावधी केवळ १४ महिने शिल्लक राहिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सौ. कुडमुलवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन सोमवारी (दि.७) विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.

लढा सुरूच राहील: सौ. कुडमुलवार
कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची जात जन्माने पित्याकडून ठरते. माझा जन्म हैदराबादमध्ये झाला असला तरी १९८७ साली लग्न झाल्यापासून मी महाराष्ट्राची कायम रहिवासी आहे. भारतीय संस्कृतीनुसार महिलेला लग्नानंतर पतीच्या घरी नांदावे लागते आणि तिथून पुढे तिचे तेच कायम वास्तव्य असते. नैसर्गिक स्थलांतरामुळे मला जन्माने मिळणारे जातीचे अधिकार बाधित करता येणार नाहीत, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आपण बाजू मांडणार आहोत. शासनाने काढलेले आदेशही चुकीचे असून आपली कायदेशीर लढाई सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया सौ. अरुणा विठ्ठलराव कुडमुलवार यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार