सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेड येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे निधन -

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर

Sudarshan MH
  • Sep 1 2020 7:22PM

नांदेड दि.1(अरविंद जाधव): राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर (वय१०४) यांनी मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला.

आज सकाळपासून महाराजांचे निधन झाल्याच्या बातम्या कानावर पडत होत्या. पण त्यास कोणी दुजोरा देऊ शकले नाही. अखेर पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या वृत्ताला सायंकाळी दुजोरा दिला. मंगळवारी रात्रीच महाराजांवर अहमदपूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

चार दिवसापूर्वी अन्नत्याग केल्याने महाराजांची  प्रकृती बिघडली होती. यादरम्यान ते संजीवन समाधी घेणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अहमदपुरच्या भक्तिस्थळ भागात हजारो लोक जमा झाले होते, नंतर ही अफवा होती असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर अहमदपुर येथील मठाच्या 50 कोटी रूपयाच्या संपत्तीचा तो वाद होता, अशीही एक चर्चा समोर आली.
स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेण्यास महाराजांनी नकार दिल्याने त्यांना नांदेडच्या खाजगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदेडचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. व्यंकटेश कांदे यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची भेट घेण्यासाठी रविवारी लातूरचे शासकीय पथक नांदेडला आले होते. त्यात लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ,नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर,नांदेडचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांचा समावेश होता. महाराजांसोबत त्यांनी संपूर्ण चर्चा इन कॅमेरा केल्याचे सांगण्यात येते. त्यात महाराजांनी स्पष्ठ केले आहे की, विद्यमान नूतन ट्रस्टी हे मी स्वत: नेमले आहेत. त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. अहमदपुर आणि हाडोळती येथील मठावर परवाच नेमलेले उत्तराधिकारी असतील. मुख्य बाब म्हणजे मठाच्या आणि ट्रस्ट च्या बाबतीत कोणत्याही पक्ष आणि संघटनेच्या हस्तक्षेप नको आहे. याच बरोबर ही सर्व माहिती राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या भक्तिस्थळ या ठिकाणी बोर्डावर लावण्यात यावी. माझ्या समाधीची खोटी माहिती कोणी दिली आहे? मला माहित नाही त्याचा योग्य तो तपासा करावा, असेही महाराजांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे एका वृत्तपत्रात छापून आले आहे.

            *अल्प परिचय*
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे वय १०४ वर्ष असून पाकिस्तानातील लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी मिळवलेले ते जिल्ह्यातील पहिले डॉक्टर
म्हणूनही त्यांची ओळख आहे. शहरापासून सहा किलोमिटर अंतरावरील नांदेड रोडवर चौदा
एकर परिसरात २००७ मध्ये महाराजांनी भक्ती स्थळाची स्थापना केली. या भक्ती स्थळावर महादेव मंदिर व प्रार्थना स्थळ असून तिथेच महाराजांचे नेहमी वास्तव्य असते. भक्ती स्थळावर सामुहिक विवाहासाठी विनामूल्य जागा दिली जाते. महाराजांचे मराठवाड्यात हजारो भक्त असून दरवर्षी श्रावण महिन्यात होणाऱ्या अनुष्ठानालाही भाविकांची गर्दी होते.

*दोन वेगवेगळे व्हिडिओ..

दोन दिवसापासून त्यांची प्रकृती अस्थिर असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांच्या उत्तराधिकारी नेमण्यावरून अनेक चर्चा सुरू आहेत. यातूनच त्यांनी अन्नत्यागही केल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी गर्दी वाढत असतानाच सोशल मिडियावर महाराजांचे व्हिडीओ व्हायरल झाले.
एका व्हिडीओतून त्यांनी प्रकृती चांगली असल्याचे सांगून मला व्यवस्थित रितीने जगू द्या, असे आवाहन करत होते. तर दुसऱ्या व्हिडीओत ते उत्तराधिकारी निवड तसेच स्वतःच्या नियोजित अंत्यविधीवर बोलत होते. यामुळे भाविकांत गोंधळ वाढला. याबाबत महाराज स्वतःच संवाद साधून माहिती देतील, या आशेने भाविक दिवसभर भक्ती स्थळावर ठाण मांडून होते. अनेक व्हिडीओ सोशल मिडियांवर धुमाकूळ घालत असतानाच त्यांची भक्तांनी मनधरणी केली. त्यानंतर बंद खोलीतूनच ध्वनिक्षेपकावरून महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार