सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विद्यार्थ्यांमुळे होऊ शकतात कमी अपघात ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर परिवहन आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केले मत

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर परिवहन आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केले मत

Sudarshan MH
  • Jan 19 2021 6:08PM


ठाणे  :  पालक आपल्या मुलांच्या शब्दाबाहेर जात नाहीत हा अनुभव लक्षात घेता सुरक्षित रस्ता प्रवासाच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थी प्रभावी माध्यम ठरू शकतात असा विश्वास ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वभर शिंदे, जयंत पाटील आणि जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी व्यक्त केला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे परिसरातील शाळा आणि विद्यालये सध्या बंदच आहेत. पण विविध शाळांमध्ये असणाऱ्या आरएसपी (विद्यार्थ्यांच्या वाहूतुकीसाठी शालेय स्तरावर नेमलेली समिती) मार्फत विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा विषयी जागृती करण्यात येणार आहे. त्या करता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विद्यार्थ्यांकरता सचित्र परिपत्रक आणि वाहूतुकीच्या नियमांची पुस्तिका तयार केली आहे. सध्या विदयार्थ्यांचे ऑन लाईन वर्ग भरत आहेत. त्यावेळी रस्ता सुरक्षेविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांचात जागृती केली जाणार आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणाले, लहान वयातच विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची जाणीव करुन दिल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. तर, वाहतुकीचे नियम माहीत असल्याने मुलंच आपल्या पालकांना सुरक्षततेची जाणीव करून देताना हेल्मेट घातलंय का?, सीट बेल्ट लावलाय का असे प्रश्न विचारतात त्याशिवाय गाडी सुरु करु देत नाहीत हे सकारात्मक दृष्य पहायला मिळतंय असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात एकूण १६ लाख ५८ हजार ६०९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा विषयी या विद्यार्थ्यांना माहिती दिल्याने लाखो पालकांना त्याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी महत्वाचा दुवा आहेत असे शिक्षणाधिकारी शेषराव बडे म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार