सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बकरी ईद निमित्त मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास सक्त मनाई - जिल्हा अधिकारी लातूर

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरीकांनी आपल्या घरीच अदा करावी.सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील.नागरीकांनी शक्य तो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

s.ranjankar
  • Jul 17 2021 5:23PM
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्ण संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत बकरी ईद दिनांक 21 जूलै 2021 रोजी (चंद्र दर्शनावर अवलंबून) अत्यंत साधेपणाने साजरी  करण्या संदर्भात पुढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरीकांनी आपल्या घरीच अदा करावी.सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील.नागरीकांनी जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दुरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरीकांनी शक्य तो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. लागू करण्यात आलेले आणी त्यांनतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.बकरी ईदच्या निमित्ताने नागरीकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.कोविड या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण ,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका ,पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनूपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असेही आदेशात नमूद केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार