सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एकात्मतेसाठी सर्वस्व अर्पण करणारे लोहपुरुष

सरदार वल्लभभाई पटेल हे पेशाने वकील होते. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील ते एक ज्येष्ठ नेते होय. इ.स१९२४ ते १९२८ पर्यंत ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी कार्य केले

निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
  • Oct 31 2020 4:05PM
देशाला एकात्म करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन आज संपूर्ण देशभर "राष्ट्रीय एकता दिवस" म्हणून आपण साजरा करत आहोत. ज्यांनी देशांना एकात्म करून बळकट करण्यासाठी प्रयत्न केले अशा या थोर महापुरुषांचे आयुष्य, जीवनशैली प्रत्येक वेळी येणाऱ्या पिढीसाठी एक नवीन प्रेरणा देते, ऊर्जा देते व बळ देते. त्यामुळे देशाला एकात्म करणाऱ्या त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची आज खरी गरज आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे पेशाने वकील होते. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील ते एक ज्येष्ठ नेते होय. इ.स१९२४ ते १९२८ पर्यंत ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी कार्य केले. भारतीय राज्यघटना तयार करण्यात सरदार पटेल यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. घटनेतील विविध कलम पास करण्यात पटेल यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. विधानसभेच्या दोन्ही महत्त्वाच्या समितीचे ते अध्यक्ष होते. राज्यघटनेत सरदार पटेल यांच्या भूमिकेचे कौतुक करताना हरी विष्णु कामथ म्हणाले की, "त्यांच्याशिवाय राज्यघटना पास करणे कठीण आहे. संविधान सभेमध्ये ते कमी बोलले असले, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव खूपच जास्त होता." सरदार पटेल हे सिद्धांतवादी नव्हते. ते पूर्णपणे व्यावहारिक नेते होते. महिलांना सशक्त आणि सक्षम बनविण्याची त्यांची दूरदृष्टी अमूल प्रकल्पातून पाहायला मिळते. शेतकऱ्यांच्या प्रती त्यांच्या मनात प्रचंड श्रद्धा होती. आपल्या प्रश्नासाठी झटणारा नेता या प्रतिमेतूनच कष्टकरी, श्रमजीवी वर्ग त्यांच्याकडे पाहत असे. कष्टकऱ्यांच्या बारडोली सत्याग्रहात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्याच वेळी त्यांना "सरदार" ही उपाधी देण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्योत्तर भारतात वल्लभभाईंना मानाचे स्थान आहे. एकात्म देशाचे ते खरे शिल्पकार असून देशाच्या संघटनात्मक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. भारताचा पोलादी पुरुष म्हणून त्यांची जगभर ख्याती होती. साधी राहणी-उच्च विचारसरणी आणि तात्काळ कृती यावर त्यांचा भर असे. त्यांच्या मते सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाचे हित. भारताच्या एकतेसाठी सरदार पटेल यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्याच्या काळात आपण भारत देश सोडून गेल्यावर हा देश विस्कटला जाईल यासाठी इंग्रजी सत्तेने निती आखली होती. येथील संस्थांमध्ये वैर निर्माण होऊन भारत कधीच एकसूत्र बांधला जाणार नाही असे त्यांना वाटे. त्यासाठी इंग्रजी सत्तेने येथे फूट पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु इंग्रजांच्या या प्रयत्नांना सरदार पटेल यांनी कधीही यशस्वी होऊ दिले नाही. त्यांनी आपल्या लोहशक्तीच्या प्रयत्नाने भारताला एकसूत्र केले. त्याचप्रमाणे विशेषतः फाळणीच्या दुःखद पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच त्यांच्या दूरदृष्टीची प्रचिती येते. त्यामुळेच पक्षीय राजकारणाचा अभिनिवेश बाजूला ठेऊन जगातील सर्वात उंच १८२ मिटर उंचीचा "स्टॅच्यू ऑफ युनिटी" हा त्यांचा "एकतेचा पुतळा" उभारण्यात आला आहे. या प्रतिमेची उंची संपूर्ण जगाने हेवा करावा अशी झाली आहे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडवून आणणारी चाणाक्ष बुद्धी, कठोर शिस्त व परिस्थितीचे विलक्षण आकलन हे राजकारणी मुत्सद्द्याला आवश्यक असणारे गुण त्यांच्यात होते. कोणत्याही प्रश्नाकडे ते फलप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून पाहत. म्हणूनच त्यांना श्रद्धांजली वाहतांना द टाइम्सने (लंडन) त्यांचा गौरव "बिस्मार्क पेक्षा श्रेष्ठ राजकारणपटू म्हणून केला आहे." सरदार पटेल यांनी देशाची समृध्दी आणि राष्ट्रीय ऐक्य टिकवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली आहेत. त्यांच्या मते, केवळ राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यासाठीच नव्हे, तर त्याच्या बांधनीसाठी आणि हमीसाठीही कार्य करा. काम करताना राष्ट्रीय, राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीय विचार नेहमी मनात ठेवा. भारत देशात बेरोजगारी आणि निरक्षरता ही आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्बलता आहे. म्हणूनच राष्ट्रीय ऐक्य आणि त्याच्या हमी उद्देशाने बेरोजगारी आणि निरक्षरता या दोन्ही गोष्टीपासून मुक्त होणे फार महत्वाचे आहे. हे केल्याशिवाय राष्ट्रीय विचारांची स्थिरता शक्य नाही. म्हणूनच सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात सर्व समानतेसाठी काम करण्याची गरज आहे. देशात राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्याच्या दृष्टीकोनात धर्म, पंथ भेदभावाची मनोवृत्ती अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करते. म्हणून प्रत्येकाने आपला धर्म, पंथ आणि राष्ट्रीयत्व यांच्यात स्पष्ट संतुलन राखणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार राष्ट्रीय गरजांना प्रथम प्राधान्य द्या. राष्ट्रीय मूल्यांची पूर्ती करणे म्हणजे स्वधर्माचे पालन करणे होय. जिथे शक्य असेल तेथे परस्पर सहकार्य करून समाजात अपरिहार्य असणारे परस्पर विवाद कमीतकमी पातळीवर सोडवायला हवेत. यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय टाळता येतो. ऐक्याच्या दिशेने, पावले देखील वाढतात. ती ऐक्याची प्रारंभिक भावना राष्ट्रीय एकतेचा आधार बनते. त्यासाठी प्रत्येक परिस्थितीत शिस्त लावत रहा. जर शिस्त राखली गेली नाही, तर शेवटी वैयक्तिक स्वार्थाने, किंवा गटाच्या हिताच्या फायद्याने संपूर्ण अनागोंदी निर्माण होते. अशा अनागोंदीच्या स्थितीत कोणताही देश एकसंघ राहू शकत नाही. देशाच्या एकतेसाठी त्यांचे हे विचार महत्वपूर्ण आहेत. भारत मातेच्या तेजाला टिकून ठेवण्यासाठी व अजुन तेजोमय करण्यासाठी सरदार पटेल यांनी फार महत्त्वाची भूमिका निभावली आहे. म्हणून ज्या थोर महापुरूषाने आपल्याला एक भारत दिला. त्या भारताला श्रेष्ठ बनवण्याची जबाबदारी आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाची आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून व आपला पुरुषार्थ जागून देशाच्या एकतेला टिकवण्यासाठी वाटचाल केली पाहिजे. सरदार पटेल यांनी देशाची समृध्दी आणि राष्ट्रीय ऐक्य टिकवण्यासाठी ठरविलेले मार्ग अंमलात आणण्याची आज मोठी गरज आहे. ज्याद्वारे भारत एकतेच्या धाग्यात बांधला जाऊ शकतो आणि लोकशाहीचा पाया मजबूत होऊ शकतो.   

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार