सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बटुळे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर.

कोरोना काळात बटुळे यांनी पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये धान्य वाटप करत डॉक्टर व नर्सचे कौतुक केले होते.

Abhimanyu
  • Nov 5 2021 11:21AM
अहमदनगर :-  ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बटुळे यांना जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वतीने समाज रत्न पुरस्कार सन २०२१ जाहीर झाला आहे. ह.भ.प.बटुळे महाराज गेल्या अनेक वर्षांपासून ,गोरगरीब अनाथ निराधार मुलांचा सांभाळ करून त्यांना शालेय शिक्षणा बरोबर अध्यात्मिक शिक्षण देत आहेत. गुरूदेव संत नारायण महाराज (श्री क्षेत्र तारकेश्वर गड) यांची सेवा व त्यांच्या संगतीत राहाण्याचा योग महाराजांच्या जीवनात आला व त्याचाच आदर्श समोर ठेऊन महाराज आज समाजात उत्कृष्ट काम करत आहेत ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बटुळे हे त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातून येणारी देणगी विद्यार्थ्यांसाठी खर्च करतात.मुलांना शालेय साहित्य तसेच कपडे वाटप करतात.कोरोना काळामध्ये महाराजांनी शेवगाव तालुका व पाथर्डी तालुक्यातील जवळपास प्रत्येक कोविंड सेंटरला धान्य बिसलरली बॉक्स, बिस्कीट वाटप केले व तेथील प्रत्येक डॉक्टर्स नर्स यांचा सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले.व कोविंड सेटंर मधील लोकांची विचारपूस करुन  पेशंटला धीर देण्याचे काम बटुळे महाराज यांनी केले. महाराज अध्यात्मिक वारसा जपतात परंतु त्यांचं बरोबर सामाजिक वारसा देखील पुढे चालवत आहेत.आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून महाराज नेहमीच चांगले काम करतात.मौजे.वाडगाव धावणवाडी. येथे एक एकर जागा विकत घेऊन नुकतेच त्यांनी.गुरूदेव संत नारायण महाराज मंदिर व अनाथ आश्रम बांधकाम सुरू केले आहे.काम प्रगतीपथावर आहे. महाराजांना लहानपणापासून परमार्थाचा छंद व आवड असल्यामुळे ते आळंदीला गेले व तेथे परमपूज्य जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत महाराजांनी किर्तंनाचा अभ्यास केला.अध्यात्मीक शिक्षणाबरोबरच  महाराजांनी शालेय शिक्षण देखील सुरू ठेवले व पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज ला एम ए पुर्ण करुन  नंतर बी एड, केले तद्नंतर गुरूदेव संत नारायण महाराज यांनी नौकरीला लावले काही वर्ष महाराजांनी शिक्षक म्हणून नौकरी केली .परंतु सन २०११ साली गुरूदेव संत नारायण महाराज अनंतात विलीन झाले.त्यामुळे बटुळे महाराज खुपचं अस्वस्थ व दुःखी झाले .गुरूदेव संत नारायण महाराज यांच्यावर त्यांची  खुप निष्ठा व विश्वास असल्यामुळे  पुढे  महाराजांनी आपल्या गुरूंच्या नावांनी संस्था सुरू करण्याचा संकल्प केला. व नौकरीत वेळ घालवण्यापेक्षा संपूर्ण वेळ अध्यात्मिक कार्यांसाठीच  देण्याचा   निर्णय त्यांनी घेतला त्यांचे मन  नौकरीत न रमता  अध्यात्मिक कार्यांत  अधिकच समरस झाले व ह.भ.प.महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांची आज्ञा घेऊन.नौकरीचा राजीनामा दिला व  मौजे.शेवगाव येथे गुरूदेव संत नारायण महाराज वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करून ,संस्थेत अनाथ मुलांना मोफत शिक्षण देऊन, त्यांची राहाण्याची व जेवणाची व्यवस्था  करत आहेत. महाराजांनी  आजतगायत  अनाथ मुलांचा सर्व खर्च स्वतः केला आहे .व याही पुढे करतच राहणार आहेत. ह.भ.प.बटुळे  महाराज उत्कृष्ट किर्तनकार आहेत तसेच अखील भारतीय वारकरी मंडळाचे ते तालुका अध्यक्ष आहेत.म्हणुनच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वतीने. दि ७ /११ सन 2021 चा समाज रत्न पुरस्कार.प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री आदिनाथ दहीफळे यांनी जाहीर केला आहे. ह.भ.प.बटुळे महाराज यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व क्षेत्रांतुन त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार