सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ओबीसीचे आरक्षण परत द्या अन्‍यथा सत्‍तेवरुन चालते व्‍हा

महाविकास आघाडी सरकारच्‍या दुर्लक्षितपणामुळे ओबीसी समाजाच्‍या हक्‍काचे राजकीय आरक्षण संपूष्‍टात आले तर मराठा समाजाचे आरक्षण टिकवता आले नाही. सर्व समाज घटकावर अन्‍याय करणाऱ्या राज्‍य सरकारवर कोणीही समाधानी नाही, कोणीच सुरक्षित नाही. रोज नवीन घोटाळे समोर येत आहेत. या शासनकर्त्‍यांना सत्‍तेवर राहण्‍याचा नैतिक अधिकार नाही. ओबीसी समाजाचे हक्‍काचे आरक्षण परत नाही दिले तर येत्‍या काळात रस्‍त्‍यावर उतरून तिव्र संघर्ष करू असा इशारा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ.रमेशअप्‍पा कराड यांनी दिला

N.B.Mohanale
  • Jun 4 2021 3:49PM


भाजपाच्‍या बोंबाबोंब आंदोलनात लातूर जिल्‍हाध्‍यक्ष आ.रमेशअप्‍पा कराड यांचा इशारा
         राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारच्‍या दुर्लक्षितपणामुळे ओबीसी समाजाच्‍या हक्‍काचे राजकीय आरक्षण संपूष्‍टात आले तर मराठा समाजाचे आरक्षण टिकवता आले नाही. सर्व समाज घटकावर अन्‍याय करणाऱ्या राज्‍य सरकारवर कोणीही समाधानी नाही, कोणीच सुरक्षित नाही. रोज नवीन घोटाळे समोर येत आहेत. या शासनकर्त्‍यांना सत्‍तेवर राहण्‍याचा नैतिक अधिकार नाही. ओबीसी समाजाचे हक्‍काचे आरक्षण परत नाही दिले तर येत्‍या काळात रस्‍त्‍यावर उतरून तिव्र संघर्ष करू असा इशारा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ.रमेशअप्‍पा कराड यांनी दिला.
          ओबीसी समाजाच्‍या हक्‍काचे आरक्षण परत मिळावे यासाठी लातूर जिल्‍हा भाजपा ओबीसी आघाडीच्‍या वतीने गुरूवारी सकाळी १२ वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालया समोर जिल्‍हाध्‍यक्ष आ.रमेशअप्‍पा कराड यांच्‍या नेतृत्‍वात बोंबाबोंब आंदोलन करण्‍यात आले. यावेळी आंदोलनात भाजपाचे जेष्‍ठ नेते गोविंदअण्‍णा केंद्रे, प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, माजी आमदार विनायकराव पाटील, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, जि.प.अध्‍यक्ष राहूल केंद्रे, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस संजय दोरवे, ओबीसी आघाडीचे जिल्‍हाध्‍यक्ष बापुराव राठोड, माजी आमदार बब्रुवान खंदाडे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले, शहर जिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे, महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा रेखाताई तरडे, युवा मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर चेवले, दशरथ सरवदे, नितीन हसाळे, बन्‍सी भिसे, सभापती रमेश सोनवणे, अजित माने, वसंतराव दिघोळे, धनश्री अर्जुन, उषा रोडगे, प्रशांत पाटील, दिलीप धोत्रे, सतीश आंबेकर, सुरेंद्र गोडभरले, संतोष वाघमारे, दिलीप मजगे, विजय काळे, दत्ता सरवदे, भागवत सोट, वसंत करमुंडे, संजय डोंगरे, स्वाती जाधव, बसवराज रोडगे, दगडू साळुंके, बालाजी केंद्रे, नागरगोजे साईनाथ, चिमेगावे शिवाजी, परगे सुनील, उटगे शाहूराज थिटे, हनुमंत देवकते, ज्ञानेश्वर वाकडे यांच्‍यासह जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतीचे सदस्य आणि सर्व पदाधिकारी जिल्‍हाभरातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, सर्व स्तरातील पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
           कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून केवळ लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्‍या उपस्थितीत केलेल्‍या या बोंबाबोंब आंदोलन प्रसंगी आंदोलकांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर शासनविरोधी घोषणा देवून परिसर दणानूण सोडला होता. उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो, आघाडी शासनाची खेळी ओबीसी आरक्षणाचा बळी, भाजपाने आरक्षण वाचविले नाकर्त्‍या शासनाने घालविले, आरक्षण आमच्‍या हक्‍काचे नाही कोणाच्‍या बापाचे यासह विविध फलक अनेकांचे लक्ष केंद्रीत करीत होते. आंदोलना नंतर भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी पृथ्‍वीराज बी.पी. यांची भेट घेवून मागण्‍यांचे निवेदन सादर केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार