सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मौलाना आझाद यांचा जन्मदिन - राष्ट्रीय शिक्षण दिवस

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्म दिन ११ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो. मौलाना आझाद यांचा भारतीय शिक्षण प्रणालीच्या विकासासाठी महत्त्वाचा वाटा आहे.

निलेशकुमार इंगोले ९३७११४५१९५
  • Nov 11 2020 3:20PM
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्म दिन ११ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो. मौलाना आझाद यांचा भारतीय शिक्षण प्रणालीच्या विकासासाठी महत्त्वाचा वाटा आहे. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म मक्का येथे ११ नोव्हेंबर १८८८ मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दिन अहमद असे असून अबुल कलाम म्हणजे 'वाचस्पती' हि त्यांची पदवी होती. भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्यामुळे पुढे 'आझाद' (स्वतंत्र) हे टोपण नाव म्हणूनही त्यांना ही उपाधी मिळाली. मौलाना आझाद यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांनी फारसी, उर्दू, अरबी भाषांचे ज्ञान मिळवले. तसेच तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान, गणित, इ. या विषयांचा अभ्यास केला. १९०८ मध्ये अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स, इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्या. लोकजागृतीसाठी सन १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी 'अल-हिलाल' हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली. तरी त्यांनी पुन्हा लोकजागृतीसाठी १९१५ साली 'अल-बघाल' हे दुसरे वृत्तपत्र काढले. अनेक वृत्तपत्रातून आजाद या टोपण नावाने त्यांनी लेखन केले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फारसी भाषांवर चांगले प्रभुत्व होते. त्यांनी अनेक वृत्तपत्रातून स्फुट लेखन केले आणि उर्दूत पुस्तके लिहिली. मौलाना आझाद यांनी आपल्या लेखनातून ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनतेला जागृत केले. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची, स्वातंत्र्य मिळविण्याची जाणीव व प्रेरणा जनतेच्या मनात आपल्या लेखनातून निर्माण केली. हे कार्य करीत असतांना आपल्या धर्माची तत्वे त्यांनी जपली. मात्र खरा धर्म 'मानवता धर्म' आहे, या मानवतावादी धर्माचे आचरण करावे, त्यातूनच समाजाची आणि देशाची सेवा करावी यासाठी त्यांनी जागृती केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक आंदोलनात ते सहभागी झाले. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने अनेकदा अटक केली. तरीही आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानाने ते अखेरपर्यंत लढले. मौलाना अबुल कलाम आझाद भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान सेनानी, खरे देशभक्त आणि राष्ट्रवादी नेते होते. जुन्या आणि नवीन कल्पनांमध्ये चांगले सामंजस्य असणारे, हिंदू-मुस्लिम ऐक्य व एकतेचे प्रबल समर्थक होते. त्यांच्या संदर्भात आचार्य जे. बी. कृपलानी म्हणाले की, "ते एक महान तत्त्वज्ञ, विद्वान, प्रभावी वक्ते, राष्ट्रभक्त आणि भारताचे विश्ववादी नेते होते." धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर त्यांचा ठाम विश्वास होता. विविधतेत एकतेचे सूत्र असणाऱ्या भारतीय संस्कृतीवर त्यांचा अटल विश्वास होता. त्यांच्या निर्भयपणाची आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची अनेक उदाहरणे आहेत. देश स्वतंत्र झाल्यावर ते पहिले शिक्षणमंत्री झाले. विद्यापीठ शिक्षण आयोग आणि माध्यमिक शिक्षण आयोग यासाठी त्यांनी वैज्ञानिक आणि तांत्रिक शिक्षणात पाठींबा दिला. त्यांच्या प्रयत्नातून विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली. शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याबरोबरच त्यांनी उर्दू भाषा आणि साहित्य क्षेत्रातही मोठी सेवा केली. त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. शिक्षणातील आधुनिक तंत्र आणि आधुनिक विचार यांना त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते. त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचार उत्तम प्रकारे राबविला. आयुष्यभर काम करत असताना २२ फेब्रुवारी १९५८ रोजी त्यांचे निधन झाले. केंद्र सरकारने १९९२ मध्ये मौलाना आझाद यांना मरणोत्तर 'भारतरत्न' किताब प्रदान करुन त्यांचा सन्मान व गौरव केला. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार