सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जय हो...

नववर्षाचं आगमन कडेकोट बंदोबस्तात झालं. रात्रीच्या ‘कर्फ्यू’मध्ये नववर्ष थोडं हिरमुसलं होतं. एकविसाव्या शतकातील तिसºया दशकाचा पहिला सूर्योदय निर्बंधासह संचारबंदीत झाला. 2ङ संगणक समस्या ते जीवघेणा कोरोना असा लांबलचक भयभीत वाटेचा दोन दशकी प्रवास संपल्याचं समाधान आहे

- रमेश कुलकर्णी ९९२२९०१२६२
  • Jan 2 2021 8:10PM
नववर्षाचं आगमन कडेकोट बंदोबस्तात झालं. रात्रीच्या ‘कर्फ्यू’मध्ये नववर्ष थोडं हिरमुसलं होतं. एकविसाव्या शतकातील तिसºया दशकाचा पहिला सूर्योदय निर्बंधासह संचारबंदीत झाला. 2ङ संगणक समस्या ते जीवघेणा कोरोना असा लांबलचक भयभीत वाटेचा दोन दशकी प्रवास संपल्याचं समाधान आहे. मागील दोन दशकातील कडू-गोड अनुभव पचवून मनुष्य मोठ्या अपेक्षेनं या तिसºया दशकाला ‘कर्फ्यू’मध्ये सामोरा जातो आहे. तिसरं दशकही टेक्नॉलॉजीचं असेल यात कुठलीच शंका नाही; परंतु मानवी ओलावा टिकून राहिला तरच त्याचा सदुपयोग होऊ शकेल, अन्यथा सर्व ‘विकास’ निरर्थक होण्याची भीती राहील. नववर्षाच्या स्वागताला सर्व अडथळे सारून मानवानं उत्साह टिकवून ठेवला. प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं हा ‘इव्हेंट’ साजरा करण्याचा प्रयत्न केला. नववर्षाच्या स्वागताला नवे संकल्प करण्याची मानवी प्रवृत्ती यावेळेसही जाणवली. केलेल्या संकल्पाची पूर्तता किती काळ होते? हा प्रश्न अनुत्तरित असला तरी स्वप्न बघण्याची मानवी सवय नवी ऊर्जा प्रदान करीत राहते. या वर्षीच्या संकल्पाला स्वयंकेंद्रित न ठेवता त्याला सामाजिक अधिष्ठान द्यावं लागणार आहे. कोरोनाष्टकात झालेल्या सामाजिक पडझडीसाठी प्रत्येकाचं योगदान लाभल्यास वर्षाची वाटचाल सुखकर होईल. कोरोनामुळे घरचा कर्ता मनुष्य गमाविलेली असंख्य परिचित कुटुंबं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांच्यावर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगराचा भार आपण हलका करू शकलो, तर मोठं योगदान ठरेल. परिवारावरील आघात मोठा आहे. त्याची भरपाई होणं केवळ अशक्य आहे; परंतु आपला अल्पसा आधार देण्याचा प्रयत्न कदाचित विस्कळीत परिवाराला सावरू शकेल, नव्यानं उभं राहण्याची ताकद निर्माण करू शकेल. नवीन वर्षात त्यांच्या चेहºयावरील हास्य आपण परत करू शकलो तर मोठी बाब ठरेल. ‘अन्नदाता’ या विषयावर भरमार लिहिणं, वाचणं झालं आहे. ‘आम्ही शेतकºयांचीच मुलं’ म्हणून अनेकदा टाहो फोडून झाला आहे. अश्रू ते कृत्रिम संवेदना सर्वच देऊन झालं आहे. आता मात्र प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. प्रत्येकानं आपल्या नववर्षाच्या संकल्पात पोशिंद्याला स्थान दिल्यास भरपूर काही बदलू शकेल. शेतकरी स्वत:च ‘दाता’ असल्यामुळे त्याला फार काही आपल्याकडून नको असतं. शेतकºयांना माझी मदत होईल, असा नववर्षाचा संकल्प करता येईल. भूमिपुत्रानं उत्पादित केलेली भाजी व अन्नधान्य थेट विकत घेण्याची व्यवस्था विकसित करता येईल. आपलं अधिकचं व्यवहारज्ञान टाळून शेतीमालाच्या भावासाठी फार घासाघीस होणार नाही याची काळजी घेता येईल. आॅनलाइन तथा मॉलमधील भाव न करता चुपचाप ‘शॉपिंग’ करण्याची सवय शेतीमालाला लावल्यास चित्रच पालटून जाईल. बळीराजाचं बळ अधिक वाढून आर्थिक स्थिरता येईल व सुखी आयुष्याची दोरी खंडित होणार नाही. नववर्षाचं आगमन म्हणजे कॅलेंडरचा बदल एवढाच होत नाही. मनुष्याच्या इच्छा, आकांक्षांच्या पूर्तीसाठी एक नवी संधी उपलब्ध होत असते. आयुष्यातील नवी स्वप्नं, नवी उमेद, नवा जोश टिकवून ठेवण्यासाठी नववर्षाचं आगमन महत्त्वाचं ठरतं. नवा संकल्प घेण्याचा मानवी स्वभाव दरवर्षीच जाणवतो. कुणाला दारू, सिगारेट सोडायची असते, कुणाला वजन कमी करायचं असतं, कुणाला नियमितपणे व्यायाम करायचा असतो, कुणाला अभ्यासात एकाग्र व्हायचं असतं, कुणाला खर्चावर कात्री आणायची असते, कुणाला कर्जफेड करायची असते, कुणाला आई-वडिलांची सेवा करायची असते, कुणाला पारिवारिक भांडण-तंटे टाळायचे असतात. एकंदरीत आयुष्याला नवीन वळण देण्याचा हा प्रयत्न नववर्षाचं निमित्त साधून केला जातो. या वर्षी तर कोरोनानं आरोग्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. प्रत्यक्षात काय होतं, हा प्रश्न गौण असला, तरी दरवर्षी उत्साह मात्र तेवढाच असतो. नववर्ष दिशादर्शक करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न वाखण्याजोगा असतो. नवी उमेद घेऊन काहीतरी योजनाबद्ध नवीन करायची धडपड आत्मविश्वास वाढविणारी असते. मनुष्याची सर्वांगीण विकासाची परिकल्पना नववर्षाच्या आगमनानिमित्त प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा प्रयत्न करता येतो. ‘नवीन काहीतरी केलं पाहिजे’ या डोक्यात फिरणाºया विचारचक्राला गती देण्याचं काम नववर्षाची सुरुवात करते. मनुष्याला वाईट गोष्टी सोडताना अधिक त्रास होतो, त्या तुलनेत चांगल्या गोष्टीची कास धरणं सोपा मार्ग ठरतो. त्यामुळे जे सोपं आहे त्याकरिता प्रयत्न वाढविण्याचा निश्चय करावा. वाईट सवयी सोडण्याचा निर्धार उपयुक्त ठरू शकतो. भविष्याचं नियोजन करण्याचा हा काळ वाया जाणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आत्मनिर्भर होत असताना आत्मकेंद्रित होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. समाजाला काही देणं आहे या भावनेतून नववर्ष संकल्पाचा निर्धार केल्यास स्वागताचा आनंद द्विगुणित होईल व आपल्या मानवजन्माचं सार्थक झाल्याचं समाधान

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार