सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खामगांवात अवैध गुटखा साठ्यावर धाड; 35 लक्ष किंमतीचा माल जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

Sudarshan MH
  • Jan 22 2021 8:23PM
 
(योगेश शर्मा)
  बुलडाणा : अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खामगांव येथील डि.पी रस्त्यावरील राघव संकुलातील गाळ क्रमांक 3 व 4 मधील अवैधरित्या साठविलेल्या प्रतिबंधीत गुटखा साठ्यावर 20 जानेवारी 2021 रोजी मध्यरात्री धाड टाकण्यात आली. यावेळी पंचासमक्ष तपासणी केली असता नजर प्रिमियम गुटखा 30 लक्ष 60 हजार रुपये, गोवा 1000 गुटखा 4 लक्ष 32 हजार रुपये, आर जे पानमसाला 71,500 रुपये व आर ओ सुगंधीत तंबाखु 550 रुपये, असा एकूण 35 लक्ष 67 हजार 50 रूपये किंमतीचा साठा जप्त करुन सिलबंद करण्यात आला आहे.
 
     राज्यात गुटका, मावा, पानमसाला व तत्सम तंबाखुजन्य पदार्थाचे उत्पादन, साठा, वितरण व विक्री या वस्तुवर प्रतिबंध घातलेला आहे. राज्याचे अन्न औषधी प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषधी प्रशासन कार्यालयाने सातत्याने प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करीत आले आहे.
 
कारवाईवेळी हजर व्यक्ती अजय सिध्दार्थ खंडारे यांच्याविरुध्द प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा विक्रीसाठी साठा केल्यावरुन अन्न सुरक्षा कायदा 2006 अन्वये खामगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कारवाई अमरावती विभागाचे सहायक आयुक्त सु. ग. अन्नापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. तसेच सहाय्यक आयुक्त स. द. केदारे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी र. द्वा. सोळंके गु. कि. वसावे, देशमुख या पथकाने ही कारवाई केली.
 
कारवाई वेळेस पोलीस उपनिरिक्षक रणजितसिंग ठाकुर यांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या पथकास सुरक्षा व सहकार्य केले. तसेच अन्न औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रतिबंधीत अन्न पदार्थाची मोहिम कठोरपणे राबविण्यात येणार आहे. प्रतिबंधीत अन्न पदार्थाची विक्री होत असल्यास निदर्शनास आल्यास जनतेने प्रशासनास कळवावे, असे आवाहन सहायक आयुक्त स. द केदारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार