सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे शहरात आता थेट सोसायट्यांमध्येच महानगरपालिकेची विशेष लसीकरण मोहीम महापौर मुरलीधर मोहोळ

संपर्क साधून थेट सोसायटीतच लसीकरण टीम बोलवता येणार

Abhimanyu
  • Oct 21 2021 10:37PM

प्रतिनिधी:-पुणे

'पुणे महानगरपालिका हद्दीत लसीकरण वेगाने तर होत आहेच मात्र राहिलेल्या नागरिकांनाही लवकर लस देणे आवश्यक असून त्यासाठी थेट सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरणाची विशेष मोहिम पुणे महानगरपालिका राबवत आहोत. या मोहिमेंतर्गत थेट सोसायट्यांमध्येच महापालिकेची लसीकरण टीम बोलवता येणार आहे',अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

लसीकरणाच्या या विशेष मोहिमेंतर्गत क्षेत्रिय कार्यालयनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नंबर प्रसिद्ध करण्यात आले असून आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर थेट टीम सोसायटीमध्ये दाखल होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, 'ज्या गृहसंस्था, सोसायटीमधील नागरिकांचे लसीकरण राहिलेले आहे, अशा सोसायट्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अपेक्षित लाभार्थी संख्या कळवावी'

पुणे मनपा हद्दीत विक्रमी लसीकरण झालेले असून असे असले तरी या लसीकरणालाआणखी वेग देण्याचा प्रयत्न आहे.आजवर लसीकरणाबाबतीत महापालिकेने राबवलेल्या सर्वच विशेष मोहीमा यशस्वी झालेल्या आहेत.या मोहिमेलाही पुणेकर प्रतिसाद देतील, हा विश्वास वाटतो',असेही महापौर मोहोळ म्हणाले.

क्षेत्रिय कार्यालयनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी
१.येरवडा-कळस-धानोरी,डॉ.माया लोहार९६८९९३१९६६ढोले पाटील रोड,डॉ.सुजाता माने९०११०४९०१०.नगररोड-वडगावशेरी,डॉ.विजय बडे ९८८१३९८०४८, शिवाजीनगर-घोलेरोड,डॉ.मृणाल कोलते९३२६०५०३४४औंध-बाणेर,डॉ.गणेश दामले७५८८१७०९९८कोथरूड-बावधन,डॉ.टिळेकर अंजली
७३५००२००१०वारजे-कर्वेनगर,डॉ.अरुणा तरडे ९८२३५१४६४४सिंहगड रोड,डॉ.काकडेआसाराम
९७६२५०५४००धनकवडी-सहकारनगर,डॉ.संदीप परदेशी ९४२३९११५६२वानवडी-रामटेकडी,डॉ.मनीषा सुलाखे ९७६४५६९४४७ हडपसर-मुंढवा,डॉ.स्नेहल काळे ९९७०९४२८७८कोंढवा-येवलेवाडी,डॉ.मदन बिरादार ९६८९९३१७२४भवानी,डॉ.सारंग,केळकर९८९०६०९४३२बिबवेवाडीडॉ अमित उदावत९४०५६९९५६०कसबा विश्रामबाग वाडा,डॉ.गोपाल उज्ज्वनकर८४२१९४८४९५

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार