सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चऱ्होलीतील प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांचे ‘स्वप्न साकार’

सदनिका चावी वाटप प्रक्रियेला आयुक्तांचा ‘ग्रीन सिग्नल’...

Shruti Patil
  • Jan 9 2024 6:34PM
पिंपरी चिंचवड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेतून चऱ्होली येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून उभारलेल्या प्रकल्पातील लाभार्थींना दि.१० जानेवारीपासून चावी वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असलेली लाभार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली असून, त्यांचे हक्काच्या घराचे ‘स्वप्न साकार’ होणार आहे. 
 
पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना चावी वाटप करण्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका भवनात बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त रामदास तांबे यांच्यासह प्रमुख अधिकारी व लाभार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. ज्या लाभार्थींनी नियमाप्रमाणे १० टक्के अनामत रक्कम भरली आहे. त्यांना तात्काळ घरांचा ताबा देण्यात येणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी अनामत रक्कम भारावी, या करिता प्रशासन आवश्यक कार्यवाही करणार आहे. 
 
पिंपरी - चिंचवड महापालिका प्रशासनाने सदनिका हस्तांतरण प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १ हजार ४४२ लाभार्थींना हक्काचे घर मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आमदार लांडगे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. सुरूवातीला महापालिका भवनामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि आमदार लांडगे यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी पाहणी करुन काम पूर्ण करण्यासाठी ‘कालबद्ध कार्यक्रम’ हाती घेतला होता. 
 
दरम्यान, भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत चऱ्होली प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आहे. त्यांचे कर्जही मंजूर झाले आहे. अनामत रक्कम लाभार्थींनी भरलेली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थींना सदनिकांचा ताबा मिळणे अपेक्षीत होते. गोरगरीब नागरिकांच्या हक्काच्या घरांचा ताबा निर्धारित वेळेत मिळावा, असा आग्रह आमदार लांडगे यांनी प्रशासनाकडे धरला होता. 
वास्तविक, कोविड महामारी आणि महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सदर प्रकल्पाला ‘खो’ बसला होता. जून- २०२२ पासून महायुती सरकारच्या काळात आमदार लांडगे यांनी या प्रकल्पासाठी वैयक्तिक लक्ष घालून प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा दाखला मिळेपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार