सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवारांचा परळी येथे निषेध

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारत भारतीय जनता युवा मोर्चा ने केला निषेध

Abhimanyu Phad
  • Jan 2 2023 12:38PM
परळी:- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानाचा आणी हुतात्म्यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर येथे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे, बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत व अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला. 
 
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी नागपूर येथे झालेल्या दिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते असे म्हणत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचा व हुतात्माचा अवमान केला होता पवारांच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे याच अनुषंगाने आज परळी वैजनाथ येथे भाजपच्या वतीने अजित पवार यांच्या प्रतिमेस जोडे मारून व अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, अजित पवारांचा अधिकार असो, अजित पवारांचं करायचं काय खाली मुंडक वर पाय अशा घोषणा दिल्या.
 
 
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष डॉ. शालिनीताई कराड, अँड अरुण पाठक, सुशील हरनगुळे , कुरील मॅडम, सचिन गित्ते, युवा नेते अश्विन मोगरकर, महादेव इटके, पवन तोड़करी ,सुचिता पोखरकर, जयश्रीताई मुंडे गित्ते, नितीन समशेट्टी, किशोर केंद्रे, अनिश अग्रवाल, मोहन जोशी, अरुण मुंडे ,ऋषिकेश नागापुरे, दीपक जोशी, राजेंद्र ओझा ,चेतन मुंडे, कृष्णा मुंडे, वैजनाथ रेकने,योगेश पांडकर, सुरेश सातभाई, गजानन राजनाळे, आकाश मुंडे, विशाल कराड, जितेंद्र मस्के, ओंकार गित्ते आदिसह भाजपाचे पदाअधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
*विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी माफी मागावी- निळकंठ चाटे*
 
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दलयांच्या बद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा राज्यभर त्यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे बीड जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे यांनी म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार