सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भिसी खाजगी सावकारकी तसेच फायनान्स च्या माध्यमातून फसवणूक झालेल्या पिडीतांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

जीवन फडकरी व त्याच्या साथीदारावर पिडीतांनी कारवाई करण्याची केली मागणी

Abhimanyu
  • Jan 28 2023 11:18PM
परळी प्रतिनिधी 
भिसी, खाजगी सावकारकी तसेच फायनान्स च्या माध्यमातून फसवणूक झालेल्या परळी वैद्यनाथ येथील पीडितांनी बीडचे पोलीस अधीक्षक  यांना दि २७ रोजी भेटून निवेदन दिले. तसेच पिडीतांनी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन जीवन महादेव आप्पा फडकरी यांने कशाप्रकारे फसवले याची सखोल माहिती दिली. यावेळी पीडित अरविंद माणिकराव गायकवाड, प्रा दयानंद केशवराव कुरुडे, निलेश प्रभुआप्पा हालगे, गिरीश विश्वनाथअप्पा भिंगोरे, शेख मजीद शेख पाशा आदीं उपस्थिती होते. यावेळी परळीतील प्रत्रकार संघाचे पदाधिकारी, संपादक, पत्रकार, विविध दैनिकांचे प्रतिनिधी  या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. 
सविस्तर माहिती अशी कि जीवन महादेवआप्पा फडकरी व त्याचे साथीदार पृथ्वीराज देशमुख उर्फ बबलू यांच्या संगनमताने भिसी, तोरल फायनान्स च्या फसवणुकी कशाप्रकारे केल्या जाते या रॉकेट पर्दाफाश केला. ५ लाखाच्या भिसीवर ३५ लाखाची मागणी, ३० हजारावर प्रतिदिनी ३००० रु व्याज, तसेच भिसी दिल्यानंतर अनामत म्हणून कोऱ्या चेक व बॉण्ड घेऊन त्याचा गैरवापर केलेला आहे. खोटे दस्तावैज तयार करून तोरल फायनान्स च्या माध्यमातून परळी शहरातील अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत देशोधडीला लावले होते मात्र शहरातील डॉक्टर शिवकांत अंदुरे यांना मारहान झाल्यानंतर सर्व पिडीतानी आक्रमक होत बीडच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले व जीवन फडकरी व त्याच्या साथीदारावर कारवाई करण्याची मागणी केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार