सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परळी वैजनाथचा बिहार होतोय का..?

शहरातील उच्चशिक्षित डॉक्टर दांपत्यास मारहाण करत खाजगी सावकाराकडून भाडोत्री महिलांच्या आधारे अपहरणाचा प्रयत्न

Abhimanyu
  • Jan 21 2023 1:55PM
परळी प्रतिनिधी : परळी शहरातील  भागवत मंगल कार्यालय शेजारी डॉक्टर दापत्यास काल दुपारच्या सुमारास दवाखान्यात घुसत मारहाण करण्यात आली असून खाजगी सावकाराने भाडोत्री महिलांच्या आधारे डॉक्टरांच्या पत्नीचा विनयभंग करत अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

सविस्तर माहिती अशी की शहरातील विद्यानगर भागात राहणारे डॉक्टर शिवकांत आंधूरे यांचे नाथ रोडवरील भागवत मंगल कार्यालय शेजारी आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे काही वर्षांपूर्वी आंधुरे यांनी जीवन फडकरी यांच्याकडून भिशीमार्फत सात लाख वीस हजार रुपये घेतले होते, मात्र फडकरी याने याचे चक्री व्याजदर करत एक कोटी सव्हीस लाख रुपये लावत आंधूरे यांना मानसिक त्रास द्यायला सुरू केले होते, तसेच त्यांच्या हॉस्पिटलवर कब्जा देखील केला होता.मात्र दोन आठवड्यापूर्वी आंधुरे यांनी आपले हॉस्पिटल ताब्यात घेत परत एकदा हॉस्पिटल सुरू केले होते. मात्र दिनांक 20 जानेवारी रोजी 11 ते 12 च्या दरम्यान जीवन फडकरी व अभय बळवंत व इतर भाडोत्री गुंड महिला यांनी आंधुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये शिरत त्यांना व त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच हॉस्पिटलच्या बाहेर वंदना आंधुरे व शिवकांत आंधुरे यांना जमावासमोर मारहाण करत वंदना आंधुरे यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र हॉस्पिटल समोर उपस्थित झालेल्या जमावामुळे वंदना यांचे अपहरण जीवन फडकरी व त्यांच्या साथीदारांना करता आले नाही, तसेच फडकरी यांनी डॉक्टर शिवकांत आंधुरे यांना लाथा बुक्क्याने मारहाण करत त्यांचे दात पाडले.
 या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात वंदना शिवकांत आंधुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर  23/2023 354 अ 325 327 323 143 147 149 504 506 भादविनुसार परळी शहर पोलीस ठाण्यात जीवन महादेवाप्पा फडकरी,  अभय बळवंत याच्यासह इतर चार ते पाच भाडोत्री गुंड महिलांवरती परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,याप्रकरणी पुढील तपास परळी शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ हे करीत आहेत.

परळी वैजनाथ शहराचे बिहार होत असल्याची नागरिकात चर्चा

परळी शहरातील नाथ रोड भागातील भागवत मंगल कार्यालय शेजारी डॉक्टर दापंत्यास त्यास खाजगी सावकार व भाडोत्री महिलांकडून मारहाण  झाल्यानंतर शहरातील नाथरोड भागातील व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीती दायक वातावरण झाले असून आता आपल्या परळी शहराचे बिहार झाले आहे असे म्हणत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच या प्रकरणाकडे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी व परळी शहर पोलिसांच्या पोलीस निरीक्षकांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार