सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतिने 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला'कार्यक्रम संपन्न

विधानसभा प्रमुख धनंजय गित्तेंच्या नेतृत्वाखाली स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती सप्ताहाचा शुभारंभ

Abhimanyu phad
  • Jan 15 2023 3:04PM
परळी वै:-बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतिने येथील गणेशपार भागात मकर संक्राती निमित्ताने तिळ गुळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. हिन्दु-हदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने परळीत 15 ते 23 जानेवारी विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन सप्ताह साजरा करण्यात येणार असुन आज परळी विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या हस्ते आज तिळ गुळ वाटत करुन शुभारंभ करण्यात आला.
     महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खा श्रीकांत शिंदे,खा.गजानन कीर्तिकर, मुख्य सचिव संजय मोरे,सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख सचिन मुळूख यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या नेतृत्वात परळी शहरात हिन्दु-हदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने 15 ते 23 जानेवारी दरम्यान विविध सामाजिक उपक्रम घेऊन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये शालेय साहित्य वाटप,आरोग्य शिबिर,रुग्णांना फळ वाटप,होतकरुना चादर वाटप,हरिहर तिर्थ घाटावर दिपोत्सव अदी कार्यक्रम घेऊन जयंती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
आज गणेश पार भागात व्यापाऱ्याना तिळ गुळ वाटप करुन या सप्ताहाला विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या शुभहस्ते प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी गणेशपार भागातील व्यापारी भगवान आण्णा हालगे, विनोद कौलवार,गणेश सावंत,गणेश कुसुमकर,सुभाष जोशी यांच्या सह ईतर व्यापारी वर्गाने,विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांचे स्वागत केले.
यावेळी बोलतांना विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांनी स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व लोकाभिमुख योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले व तिळगुळ देऊन घेऊन ऋणानुबंध कायमस्वरूपी जपणार असल्याचा आवर्जून त्यांनीउल्लेख केला.बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने सर्व व्यापारी वर्ग,गणेशपार भागातील सर्व नागरिकांना तिळगुळ वाटप करण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेनेचे, सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख, संजय गावडे कदम,दीपक जोशी,उत्तम लोखंडे, नवनाथ सरवदे,रमेश लोखंडे, सागर बुंदूले,वैजनाथ लोखंडे, गणेश सारस्वत,हनुमान गिरी,वैजनाथ देशमुख, परशुराम गिरी,सचिन देशमुख, जगन्नाथ कदम,संतोष गिरी,पांडुरंग पानखडे,भागवत कदम,नारायण वाघमरे,लव्हूआप्पा हालगे,आशिष बुदूले,राहुलभाऊ,यांच्यासह असंख्य बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार