सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परळी शहरातील फेरीवाल्यांची नगरपरिषदेने वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करावी

परळी व्यापारी महासंघाचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन

Abhimanyu
  • Jan 13 2023 12:44PM

परळी प्रतिनिधी:-  परळी शहरातील फेरीवाले व भाजीवाले  मोंढा भागातील रोडच्या मधोमध दुकान थाटून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्यामुळे,परळी व्यापारी महासंघाने आज नगर परिषदेला निवेदन दिले आहे.
सविस्तर माहिती अशी की परळी येथील मोंढा भागात मकर संक्रांतीच्या अगोदर दोन-तीन दिवस फेरीवाले व भाजीवाले व इतर गाड्या वाले टॉवर ते मार्केट रोडवर तीन लाईन मध्ये रस्त्यावर आपले दुकान थाटत असून त्यामुळे परळी शहरातील वाहतुकीस अडथळा होत आहे.यामुळे काही दुकानदारांचा व्यापार ठप्प होत असून, दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये तंटे होत आहेत तरी परळी नगर परिषदेने फेरीवाल्यांची व भाजीवाल्यांची  इतर ठिकाणी व्यवस्था करावी जेणेकरून वाहतुकीस व  दुकानदारांना अडथळा होणार नाही या मागणीचे निवेदन आज परळी व्यापारी महासंघाने परळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले.
या निवेदनावर परळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, नंदकिशोर बियाणी, बंडू गरड ,शंकर आडेपवार, बद्रीनारायण बाहेती, श्रीनिवास रुद्रवार ,प्रभाकर चव्हाण, काशिनाथ देशमुख ,आकाश कलंत्री, हनुमान जाधव ,धनंजय लिंगाडे आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.
*परळी शहर पोलिसांनाही दिले होते निवेदन*

     व्यापारी महासंघाच्या वतीने मोंढा मार्केट भागात रस्त्याच्या मधोमध दुकाने थाटून  रहदारीस अडथळा केल्या प्रकरणी या अगोदरही परळी शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. परंतु सदरील निवेदनावर कसल्याही प्रकारची कारवाई परळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केली नाही याचाच परिणाम आज तंट्यांमध्ये झाला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार