सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रातील पालघरमध्ये साधूंच्या निर्घृण हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा; सीबीआय तपासाला उद्धव ठाकरे सरकारने केला होता विरोध

शिवसेना नेते किरण पावसकर यांनी दावा केला आहे, की तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर साधू हत्याकांडाची चौकशी थांबवली होती.

Shruti Patil
  • Apr 16 2024 2:17PM

मुंबई: २०२० च्या पालघर साधू हत्याकांड प्रकरणावर एक मोठा खुलासा करतांना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते किरण पावसकर यांनी दावा केला आहे, की तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर साधू हत्याकांडाची चौकशी थांबवली होती.

शिवसेनेचे सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी आरोप केला आहे, की उद्धव ठाकरे यांनी २०२० च्या पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचे केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) कडे हस्तांतरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार थांबवले होते. "२०२० मध्ये पालघर येथील साधूंची हत्या झाली, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा एकच मागणी होती आणि ती म्हणजे राज्य सरकारकडून चौकशी मागे घेऊन सीबीआयकडे सोपवा. एक व्यक्ती, जो आपण हिंदुत्ववादी आहोत, बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, त्याच व्यक्तीने हे सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही आणि राज्य सरकारकडेच राहील, असे सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार