सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गणपती उत्सवाला शंभर नियम; मग बकरी ईदला मुभा कशासाठी? सेक्युलर शासनाने कायदा समान राबविण्याची अपेक्षा

गणपती उत्सवाला शंभर नियम; मग बकरी ईदला मुभा कशासाठी

Nandurbar. MH
  • Jul 2 2021 6:31AM
नंदुरबार- गणेशउत्सव संदर्भात नियमावली जाहीर करीत श्री गणेशाच्या आगमनाच्या अन विसर्जनाच्या मिरवणुका, आरत्या सलग दुसऱ्या वर्षीही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच वेळी मात्र बकरी ईदसाठी कोणतीही नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. मग ईद साजरी करण्याने कोरोना प्रसार होणार नाही का? ईदचा ऊत्सव बंधनमुक्त ठेवायचा आणि गणेशोत्सवाला शंभर अटीनियम लादायच्या हा शासनाचा सर्वधर्म समभाव आहे का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने जारी केल्या असून यंदाही गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यास मनाई केली आहे. पारंपारिकरित्या विसर्जन स्थळी आरती करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गणपती उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारच्या गणेश मंडळांचा यंदाही प्रचंड
हिरमोड झाला आहे. गणेश मूर्ती बनविण्यासाठी नंदुरबार शहर पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गणपती मूर्ती बनवणारे जवळपास दीडशे कारखाने चालतात. शेकडो मूर्तिकार आणि मजूर त्यामाध्यमातून पोट भरत असतात. तथापि शाडू माती वापराचे आणि मूर्तीच्या आकाराचे बंधन घालण्यात आल्यामुळे या रोजगारावर पाणी फिरले आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हापासून गणपती उत्सव देखील कायदे नियमांच्या आणि बंधनाच्या जाळ्यात अडकला आहे. नंदुरबार शहरातील गणपती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुका, अनेक तास त्यानिमित्त चालणारे ढोल-लेझीम चे प्रदर्शन, प्रचंड गुलालाची उधळण करीत नाचणारी तरुणाई या सर्वाचे आकर्षण मुंबई पुणे नाशिक येथील लोकांनाही भुरळ घालत आले आहे. तथापि मागील वर्षी कोरोना मुळे हे सर्व बंद ठेवण्यात आले होते. नंदुरबारच्या इतिहासात प्रथमच गणेश उत्सव मिरवणुकांच्या विना पार पडला होता. यावरून गणेशभक्तांमध्ये प्रचंड रोष होता. परंतु यंदा देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. शासनाने पुन्हा निर्बंध घातल्यामुळे गणेश भक्त प्रचंड दुखावतील हे स्पष्ट दिसत आहे.
     कारण कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना करणारे परिपत्रक गृह विभाग उप सचिव संजय खेडेकर यांनी जारी केले आहे. परिपत्रकात याविषयी स्पष्ट म्हटले आहे की, श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन याच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.
    परीपत्रकात पुढे म्हटले आहे की, श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फूटांच्या मर्यादेत असावी. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. यासह अनेक सूचना देण्यात आले आहेत. ह्या परिपत्रकावरून गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गणेश उत्सवास दोन महिने अवकाश आहे. गणेश उत्सव ऑगस्टमध्ये असताना आतापासून नियमावली घोषित का करण्यात आली. गणेश भक्तांच्या म्हणजेच हिंदूंच्या उत्साहावर विरजण टाकणारी जाचक नियमावली जाहीर करण्याची एवढी घाई गृह विभागाने कशासाठी केली? हा प्रश्न गणेश भक्तांनाा पडला आहे. 
 गणेश उत्सवाच्या आधी 21 जुलैला बकरी ईद आहे. त्यासाठी नियमावली का बनवण्यात आली नाही? बनविली असल्यास जाहीर का करण्यात आली नाही? ईद साजरी करण्याच्या निमित्त होणाऱ्या प्राणीमांस हाताळणीच्या माध्यमातून कोरोना प्रसार होऊ नये; यासाठी शासनाने कोणती पूर्वतयारी ठेवली आहे ? यापैकी कशाचीही उत्तर मिळत नाही. वास्तविक कोरोनाचा इतिहास पाहता हा रोग मूलतः जिथून आला त्या चीनने देखील मांसाहाराचा बाजार कारणीभूत मानला होता. मांसातून प्रसार झाल्याचे त्यांच्या संशोधकाने त्या काळी मान्य केले होते.
मग कोरोना प्रसाराला प्रतिबंध करू पहाणाऱ्या शासनाकडून बकरी ईदला होणाऱ्या गर्दीला अन मांस विक्रीला मुभा देण्याचे कारण काय? बकरी ईद निमित्ताने दिवसा ढवळ्या गायी बैलांची चोरी, अवैध तस्करी व साठवणूक होत असताना सरकार मात्र प्लास्टर ऑफ पेरिसच्या कथित पर्यावरणीय धोक्यावर लक्ष केंद्रित करते. हे तर मोठे धर्मभेदी धोरण आहे. सर्व नियमनियमावली फक्त हिंदूंनी राखायचे. मुस्लिमांनी मात्र प्रसार रोखण्याला हात हातभार लावण्या ऐवजी खुले पणाने 5 वेळच्या नमाज एकत्र पढून मऱकज सारखे प्रकार घडवायचे हे सेक्युलॅरिझम च्या धोरणात बसणारे आहे का? कायद्याला सर्व समान असतात असे फक्त कागदावर न म्हणता सरकारी यंत्रणेने खरोखर तसे आचरण करावे आणि ज्याप्रमाणे हिंदूंना कायद्याचा दंडुका दाखविला जातो त्याप्रमाणे अन्य धर्मियांना देखील कायद्याचा दंडुका दाखविण्याची हिम्मत करायला हवी ही सर्व समस्त गणेशभक्तांची अपेक्षा आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार