सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आता लातूर जिल्ह्यातील जातीवाचक गावांची नावे बदलणार

लातूर शहरातील आणि जिल्ह्यातील गावांची जातीवाचक नावे बदलुन त्या गावाना महापुरुषांचे नावे देणार असल्याचे निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील अशा गावांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात गावे, रस्ते, चौक, वाड्या-वस्त्या यांची पाहणी करून नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

s.ranjankar
  • Jul 7 2021 3:47PM

लातूर: लातूर शहरातील आणि जिल्ह्यातील गावांची जातीवाचक नावे बदलुन त्या गावाना महापुरुषांचे नावे देणार असल्याचे निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील अशा गावांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात गावे, रस्ते, चौक, वाड्या-वस्त्या यांची पाहणी करून  नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात जातीवाचक नावावर आधारित शहरी आणि ग्रामीण भागातील वस्ती व रस्त्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिंदे समाज कल्याण अधिकारी खामित्कर चाकूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे रेनापुर चे मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.
प्रत्येक वस्ती रस्ते आणि चौकाची पाहणी करून अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा फक्त अभिलेख सादर करून चालणार नाही तर बारकाईने लक्ष देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनुदान मंजूर झालेल्या वस्त्या रस्ते आणि मोहल्ले यांच्या नावाची व्यक्तिशः तपासणी करून कार्यादेश निर्गमित करावेत तपासणी अशी नावे आढळून आल्यास त्या अनुषंगाने ठराव करून नाव बदलण्यासाठी संबंधित यंत्रणेला मुदत द्यावी तसेच डीपीडीसीच्या वेळेस जातीवाचक नावे बदलून त्या ठिकाणी महापुरुषांच्या नावाने बदल झाल्याची खात्री करून पुढील कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी दिले आहेत.
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार