सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनामुळे मरणोत्तर नेत्रदानास शुन्य प्रतिसाद, संकल्प करण्याचे समितीचे आवाहन

नवापूर - अन्नदान, कन्यादान रक्तदान,देहदान, याप्रमाणे नेत्रदान देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

Sudarshan MH
  • Jun 9 2021 5:27PM

 नवापूर -  अन्नदान, कन्यादान रक्तदान,देहदान,  याप्रमाणे नेत्रदान देखील तितकेच महत्त्वाचे आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे मरणोत्तर नेत्रदानास शुुनय  प्रतिसाद मिळाला आहे.एका अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश येण्यासाठी मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी इच्छुकांनी संकल्प अर्ज भरण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीतर्फे करण्यात आले आहे.                        आज दिनांक 10 जून रोजी जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून  नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे कि, मरणोत्तर नेत्रदान  करण्यास 
वयाच्या अटीमुळे नेत्रदानाचे प्रमाण घटले.  अकस्मात मृत्यु  किंवा अपघात, आत्महत्या, विषप्राशन, आदी कारणामुळे मृत्यू झाल्यास नेत्रदान करण्यासाठी नातेवाईकांचे   समुपदेशन आणि जनजागृतीसाठि प्रयत्न होणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीतर्फे जिल्हा निर्मितीच्या आधीपासून जनजागृती व प्रबोधन करण्यात येत आहे. आतापर्यंत  शंभराहून अधिक दात्यांनी मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे नेत्रदान चळवळीला बळ प्राप्त झाले आहे. समितीतर्फे मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या दात्यांच्या नातेवाईकांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात येतो. नेत्रदानासाठी संकल्प करणे आता गरजेचे आहे.  मृत्यूनंतर डोळे दान करण्याचा संकल्प करून व नातेवाईकांकडून तो पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करावी. यासाठी लेखी संकल्पपत्र भरून त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या घेणे आवश्यक  असते. मृत व्यक्तीचे नातेवाईक सुद्धा नेत्रदानासाठी संमती देऊ शकतात.  नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीत अध्यक्ष  डॉ. शिवाजीराव पाटील,( नाट्य मंदिराजवळ ) उपाध्यक्ष सुरेश जैन,( जनता बँके मागे) सचिव डॉ. अर्जुन लालचंदाणी, (सिंधी कॉलनी,   9423905337) सदस्य  महादू हिरणवाळे, 8208147121 (शिवम फोटोज, बालवीर चौक, नवा भोई वाडा, नंदुरबार ) श्रीराम दाऊत खाने  ( मेघ नगर, )याठिकाणी इच्छुकांनी  मरणोत्तर नेत्रदान संकल्प अर्जासाठी समितीच्या पदाधिकारींशी संपर्क  साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. जगता जगता रक्तदान, जाताजाता अवयवदान किंवा देहदान आणि गेल्यानंतर नेत्रदान हा आयुष्याचा मूलमंत्र ठरावा असेही समितीतर्फे सांगण्यात आले आहे.

  (प्रतिनिधी गणेश वडनेरे नवापूर)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार